मालेगावात किरीट सोमय्या यांना मुस्लिम महिलांकडून विरोध
Malegaon Kirit Somaiya
मालेगावात किरीट सोमय्या यांना मुस्लिम महिलांकडून विरोध


मालेगाव, 24 फेब्रुवारी, (हिं.स.)। मालेगावला माजी खासदार किरीट सोमय्या यांना मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालेले होते.

किरीट सोमय्या हे मंगळवारी मालेगाव दौऱ्यावर आले होते. वर्षभरापूर्वी येथे जन्म प्रमाणपत्रांचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर सोमय्या हे यापूर्वी अनेकदा मालेगावात आले आहेत. या दौऱ्यांच्या निमित्ताने त्यांनी यापूर्वी अनेकदा महसूल, पोलीस व महापालिका कार्यालयामध्ये संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत. सोमय्या यांच्या तक्रारीनंतर मालेगावातील जवळपास साडेचार हजार जन्म प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत. बोगस जन्म प्रमाणपत्रे मिळविणाऱ्यांमध्ये बांगलादेशी व रोहिंगे घुसखोर असल्याचा देखील त्यांचा आरोप आहे.

दुसऱ्या बाजूला स्थानिक मुस्लिम समुदायाकडून सोमय्या यांच्या भूमिकेला विरोध केला जात आहे. जन्म प्रमाणपत्रे रद्द करणे ही प्रशासकीय चूक असून त्यातील काही अर्जदारांच्या कागदपत्रांमध्ये केवळ त्रुटी आहेत, त्यात त्यांचा दोष नाही, असा दावा केला जात आहे.या पार्श्वभूमीवर सोमय्या यांच्या आजच्या अधिकृत दौऱ्यात महापालिका भेटीचे कोणतेही नियोजन नव्हते. मात्र, ते अचानक महापालिकेत येऊ शकतात, या शक्यतेमुळे दुपारी १२ वाजेपासूनच आंदोलन महिलांनी प्रवेशद्वाराजवळ ठिय्या मांडला.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande