नथिंग फोन 4a सिरीज मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार लॉन्च
मुंबई, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। ब्रिटनची स्मार्टफोन निर्माता कंपनी नथिंग भारतात आपल्या नवीन नथिंग फोन 4a सिरीजचा लॉन्च मार्चच्या पहिल्या आठवड्यात करणार आहे. या सिरीजमध्ये नथिंग फोन 4a आणि नथिंग फोन 4a प्रो असे दोन मॉडेल्स सादर केले जाणार आहेत. लॉन्च
Nothing Phone 4a Series


मुंबई, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। ब्रिटनची स्मार्टफोन निर्माता कंपनी नथिंग भारतात आपल्या नवीन नथिंग फोन 4a सिरीजचा लॉन्च मार्चच्या पहिल्या आठवड्यात करणार आहे. या सिरीजमध्ये नथिंग फोन 4a आणि नथिंग फोन 4a प्रो असे दोन मॉडेल्स सादर केले जाणार आहेत. लॉन्चपूर्वीच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर मायक्रोसाइट लाईव्ह करण्यात आली असून, फोनची विक्री लॉन्चनंतर त्वरित ऑनलाइन सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

कंपनीने स्टँडर्ड नथिंग फोन 4a चे डिझाइन अधिकृतरीत्या उघड केले आहे. ब्रँडची ओळख ठरलेला ट्रान्सपरंट इंडस्ट्रियल लूक या फोनमध्ये कायम ठेवण्यात आला आहे. फोनच्या मागील बाजूस हॉरिझॉन्टल पिल-शेप्ड मॉड्यूलमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला असून, कॅमेरा आयलंडच्या बाहेर एलईडी फ्लॅश दिली आहे. सध्या हा फोन पांढऱ्या रंगात दाखवण्यात आला आहे.

यावेळी कंपनीने लाइटिंग सिस्टिममध्ये मोठा बदल केला आहे. कॅमेऱ्याच्या उजव्या बाजूस नवीन “Glyph Bar” देण्यात आला आहे. या बारमध्ये एकूण नऊ लहान एलईडी दिवे असून, त्यात सहा पांढरे आणि एक लाल दिवा समाविष्ट आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार हा नवीन Glyph Bar आधीच्या ए-सीरीजपेक्षा 40 टक्के अधिक ब्राइट असून प्रकाश अधिक नैसर्गिक आणि कमी फैलाव असलेला दिसतो.

स्पेसिफिकेशन्सबाबत बोलायचे झाल्यास, फोनमध्ये Snapdragon 7s Gen 4 प्रोसेसर मिळण्याची शक्यता आहे, ज्याची पीक क्लॉक स्पीड 2.71GHz पर्यंत जाऊ शकते. यात 5,400mAh क्षमतेची बॅटरी आणि 50W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो. 6.7 इंचांची 1.5K AMOLED डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट ही देखील याची वैशिष्ट्ये असतील, अशी अपेक्षा आहे.

किंमत आणि उपलब्धतेची अधिकृत माहिती 5 मार्च रोजी होणाऱ्या लॉन्च इव्हेंटमध्ये जाहीर होईल. कंपनीचे सीईओ Carl Pei यांनी यावर्षी नथिंग फोन 4 लॉन्च होणार नसल्याचे स्पष्ट केले असून सध्या नथिंग फोन 3 हेच प्रीमियम सेगमेंटमधील प्रमुख मॉडेल आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande