पाकिस्तान: अफगाणिस्तान सीमेजवळ बंदूकधारांकडून पाच पोलिसांची हत्या
इस्लामाबाद, 24 फेब्रुवारी (हिं.स.)।उत्तर-पश्चिम पाकिस्तानमध्ये बंदूकधाऱ्यांनी एका पोलीस वाहनावर मंगळवारी हल्ला करून पाच अधिकाऱ्यांची हत्या केली. मात्र, या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. हा हल्ला अफगाणिस्तान सीमेलगत अ
पाकिस्तान: अफगाणिस्तान सीमेजवळ बंदूकधारांकडून पाच पोलिसांची हत्या


इस्लामाबाद, 24 फेब्रुवारी (हिं.स.)।उत्तर-पश्चिम पाकिस्तानमध्ये बंदूकधाऱ्यांनी एका पोलीस वाहनावर मंगळवारी हल्ला करून पाच अधिकाऱ्यांची हत्या केली. मात्र, या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. हा हल्ला अफगाणिस्तान सीमेलगत असलेल्या कोहाट शहरात झाला. त्याच्या एक दिवस आधी जवळच्या करक शहरात ड्रोन आणि गोळीबाराच्या हल्ल्यात तीन अर्धसैनिक जवानांचा मृत्यू झाला होता.

सध्या पाकिस्तान दहशतवादी हल्ले रोखण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. जवळपास दररोज नवे हल्ले होत असून, अफगाणिस्तान सीमेजवळ तणावही वाढत आहे.कोहाट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक बंदूकधाऱ्यांनी पोलीस गस्ती वाहनाला लक्ष्य केले. ठार झालेल्या पाच पोलिसांमध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्याचाही समावेश आहे. हल्लेखोरांनी वाहनालाही आग लावली. दोन्ही हल्ल्यांची जबाबदारी अद्याप कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही.

दरम्यान, पाकिस्तानने शनिवारी अफगाणिस्तानमध्ये हवाई हल्ले (एअर स्ट्राइक) केल्याचे सांगितले होते. पाकिस्तानच्या मते, हे हल्ले पाकिस्तानमध्ये झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटांसाठी जबाबदार असलेल्या दहशतवादी तळांवर (मिलिटंट कॅम्प) लक्ष्यित होते. मात्र, काबूल आणि संयुक्त राष्ट्र संघ यांनी या कारवाईत किमान १३ सामान्य नागरिकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.

इस्लामाबादच्या मते, काही दहशतवादी गटांना अफगाणिस्तानमध्ये आश्रय मिळालेला आहे. तेथूनच ते सीमापार हल्ल्यांचे नियोजन करून त्यांची अंमलबजावणी करतात. मात्र, अफगाणिस्तानने हे आरोप फेटाळले असून, दहशतवाद ही पाकिस्तानची अंतर्गत समस्या असल्याचे म्हटले आहे. तालिबान सरकारचे प्रवक्ते जबिहुल्लाह मुजाहिद यांनी मंगळवारी प्रतिक्रिया देताना म्हटले की, पाकिस्तानचा हल्ला हा दहशतवादी कृत्य असून त्यात अफगाण भूमीवरील सामान्य नागरिकांना लक्ष्य करण्यात आले आणि अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचा भंग झाला.

अफगाणिस्तान सीमेलगतचे जिल्हे अनेक वर्षांपासून विविध इस्लामी दहशतवादी संघटनांचे आश्रयस्थान राहिले आहेत. त्यात पाकिस्तानी तालिबानचाही समावेश आहे. पाकिस्तानी तालिबानला तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या नावानेही ओळखले जाते आणि २००७ पासून ते पाकिस्तानविरोधात सशस्त्र लढा देत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande