छ. संभाजीनगर - प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आठवड्यात सोडत
छत्रपती संभाजीनगर, 24 फेब्रुवारी, (हिं.स.) - प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पडेगाव, हसूल येथे उभारण्यात येत असलेल्या गृह प्रकल्पाला सर्वाधिक पसंती असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील घरांच्या वितरणासाठी आठवडाभरात
छ. संभाजीनगर - प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आठवड्यात सोडत


छत्रपती संभाजीनगर, 24 फेब्रुवारी, (हिं.स.) - प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पडेगाव, हसूल येथे उभारण्यात येत असलेल्या गृह प्रकल्पाला सर्वाधिक पसंती असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील घरांच्या वितरणासाठी आठवडाभरात सोडत काढण्यात येणार आहे. ज्या या प्रकल्पातील घर मिळेल त्यांना साडेचार लाखांची सबसिडीदेखील मिळणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यात पडेगाव येथे ५०४ घरे बांधण्यात येणार आहेत. हसूल येथे ७६२, सुंदरवाडी येथे ३२८८ तर तिसगाव येथे ६५०० घरांचे बांधकाम करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात एकूण ११ हजार ५०० घरांचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाकडे ५१६२ अर्ज संबंधित लाभार्थीकडून प्राप्त झाले आहेत. अर्ज करणाऱ्या लाभार्थीनी त्यांच्या पसंतीनुसार प्राधान्य दिले आहे. त्यामुळे प्राप्त झालेल्या अर्जातून सोडत काढून घरांचे वाटप करण्यात येणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोडत काढण्यासाठी महापालिकेने एका सॉफ्टवेअर कंपनीशी करार केला आहे. या कंपनीने तयार केलेल्या सॉफ्टवेअरची तांत्रिक तपासणी पवई येथील आयआयटी संस्थेकडून करण्यात येत आहे. तपासणीचा अहवाल आल्यानंतर सोडतीचा कार्यक्रम जाहीर होईल. आठवडाभरात ही प्रक्रिया होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande