नाशिक : 'प्रोजेक्ट्स टुडे'ने लॉन्च केला एआय-आधारित व्यवसाय संधी प्लॅटफॉर्म
नाशिक, 24 फेब्रुवारी (हिं.स.) : भारतातील प्रकल्प क्षेत्राला अधिक सशक्त करण्यासाठी ''प्रोजेक्ट्स टुडे''ने एआयवर आधारित नवीन व्यवसाय संधी प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे प्रकल्पांची संपूर्ण माहिती, टेंडर्स, सर्वात कमी बोली (एल1) आणि ऑ
प्रॉजेक्ट टुडे लोगो


नाशिक, 24 फेब्रुवारी (हिं.स.) : भारतातील प्रकल्प क्षेत्राला अधिक सशक्त करण्यासाठी 'प्रोजेक्ट्स टुडे'ने एआयवर आधारित नवीन व्यवसाय संधी प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे प्रकल्पांची संपूर्ण माहिती, टेंडर्स, सर्वात कमी बोली (एल1) आणि ऑर्डर्सचे अपडेट्स तसेच संबंधित महत्त्वाच्या व्यक्तींची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. यामुळे कंपन्यांना योग्य वेळी योग्य प्रकल्पांशी जोडले जाणे सोपे होईल.

या सुधारित प्लॅटफॉर्ममध्ये 'एआय' तंत्रज्ञानाचा वापर करून व्यावहारिक परिणामांवर लक्ष केंद्रित केले गेले आहे. यामध्ये बीओक्यू सर्च, उप-प्रकल्पांचा मागोवा, टेंडरपासून ऑर्डरपर्यंतचा प्रवास, निविदा भरणाऱ्यांची माहिती आणि व्यावसायिक संधींचा अंदाज घेणारी साधने समाविष्ट आहेत. तसेच, विश्वासार्हता तपासण्यासाठी डॅशबोर्ड आणि महत्त्वाच्या व्यक्तींशी संबंध जोडणारी यंत्रणा देखील उपलब्ध आहे. यामुळे कंपन्यांना केवळ 'सद्यस्थिती'च नव्हे, तर 'पुढे काय करावे' हेही समजण्यास मदत होईल, ज्यामुळे त्यांना योग्य निर्णय घेता येतील.

'प्रोजेक्ट्स टुडे'कडे 25 वर्षांहून अधिक संशोधनाचा अनुभव असून सध्या ५० हजारांहून अधिक सक्रिय प्रकल्पांची माहिती उपलब्ध आहे. हे प्रकल्प नियोजन, टेंडर किंवा अंमलबजावणीच्या विविध टप्प्यांवर आहेत. या प्लॅटफॉर्मवर दरमहिन्याला 1500 पेक्षा जास्त नवीन प्रकल्प, 10 हजारांहून जास्त टेंडर्स, तसेच 1200 हून अधिक एल-1 व ऑर्डर अपडेट्स उपलब्ध होतात, ज्यामुळे कंपन्यांना अचूक व्यावसायिक निर्णय घेता येतात.या उपक्रमाचा उद्देश फक्त माहिती पुरवणे नाही, तर देशाच्या उभारणीशी संबंधित प्रमोटर्स, कंत्राटदार, सल्लागार, पुरवठादार, सेवा पुरवठादार आणि वित्तपुरवठादार यांच्यामध्ये व्यावसायिक संधींचा अखंड प्रवाह सुनिश्चित करणे आहे. 'ग्राहक प्रथम, राष्ट्र सदैव' या तत्त्वावर आधारित हा उपक्रम नवनवीन तंत्रज्ञान आणि सखोल ज्ञानासह सातत्याने प्रगती करत राहील.या प्लॅटफॉर्ममुळे भारताची 'प्रकल्प अर्थव्यवस्था' अधिक मजबूत होईल. योग्य वेळी सहभाग, उत्तम समन्वय आणि कामाचा वेग वाढवून प्रकल्पांचे नियोजन यशस्वी भागीदारी आणि प्रत्यक्ष परिणामांमध्ये रूपांतरित होईल, असा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.

प्रोजेक्ट्स टुडे बद्दल:

सन 2000 पासून कार्यरत 'प्रोजेक्ट्स टुडे' हा भारतातील अग्रगण्य प्रकल्प माहिती व्यासपीठ आहे, जे विविध क्षेत्रांतील प्रकल्प, निविदा आणि करार यांविषयी संपूर्ण जीवनचक्रावर आधारित माहिती पुरवते, ज्यामुळे संस्थांना व्यावसायिक संधी ओळखण्यास आणि त्यांचा प्रभावी पाठपुरावा करण्यास मदत होते.

------------------------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande