सोलापूर - सहा महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका
सोलापूर, 24 फेब्रुवारी, (हिं.स.)सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या ‘अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षा’ने (AHTU) सहा महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध लावून तिला सुरक्षित ताब्यात घेतले. संशयित आरोपी सच्चुकुमार कृष्णा चंद्रबन्सी याला
सोलापूर - सहा महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका


सोलापूर, 24 फेब्रुवारी, (हिं.स.)सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या ‘अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षा’ने (AHTU) सहा महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध लावून तिला सुरक्षित ताब्यात घेतले. संशयित आरोपी सच्चुकुमार कृष्णा चंद्रबन्सी याला चाकण परिसरातून अटक करण्यात आली. या संदर्भात विजापूर नाका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे.

आरोपीने मुलीला आमिष दाखवून पळवून नेल्याचा आरोप आहे. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी तपास AHTU कडे वर्ग करण्यात आल्यानंतर पथकाने तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांच्या मदतीने अवघ्या १८ दिवसांत छडा लावला. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी आंबेठाण रोड, बिरवडी (चाकण, पुणे) येथे छापा टाकून आरोपी व मुलीला ताब्यात घेण्यात आले. २२ फेब्रुवारी रोजी पुढील कार्यवाहीसाठी त्यांना विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले.ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने, पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande