‘बीलाईव्ह’ कडून पुणे शहरात ५ हजार ई-दुचाकी तैनात होणार
पुणे, 24 फेब्रुवारी, (हिं.स.)। पुण्यात प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढत असताना हरित वाहतुकीचे पाऊल आता पडू लागले आहे. उद्योगांसाठी इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचा ताफा उपलब्ध करून देणाऱ्या बीलाईव्ह या कंपनीने ‘बीलाईव्ह ईझी’ उपक्रम पुण्यात सुरू केला आहे
‘बीलाईव्ह’ कडून पुणे शहरात ५ हजार ई-दुचाकी तैनात होणार


पुणे, 24 फेब्रुवारी, (हिं.स.)। पुण्यात प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढत असताना हरित वाहतुकीचे पाऊल आता पडू लागले आहे. उद्योगांसाठी इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचा ताफा उपलब्ध करून देणाऱ्या बीलाईव्ह या कंपनीने ‘बीलाईव्ह ईझी’ उपक्रम पुण्यात सुरू केला आहे. या उपक्रमा अंतर्गत पुण्यात पुढील तीन वर्षांत ५ हजार ई-दुचाकी तैनात केल्या जाणार आहेत.देशात पुणे शहरात दुचाकींची संख्या सर्वाधिक आहे. याचवेळी ई-कॉमर्स आणि जलद गती वितरण क्षेत्राची वेगाने वाढ होणाऱ्या देशातील आघाडीच्या १० शहरांमध्ये पुण्याचा समावेश आहे. आगामी काळात ऑनलाइन वितरण क्षेत्राची वाढ होत राहणार आहे. या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना वितरणासाठी ई-दुचाकी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पुण्यातील वेगाने वाढणाऱ्या ई-कॉमर्स आणि जलद गती वितरण क्षेत्राला या ई-दुचाकींचे पाठबळ मिळेल.

ऑनलाईन वितरण क्षेत्रातील कंपन्यांना ई-दुचाकी वाहने भाड्याने तसेच भाडेतत्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.गुंतवणूकदारांना फ्रँचायझी आधारित गुंतवणूक पद्धतीद्वारे या वाहन ताफ्यात सहभागी होण्याची संधी दिली जाणार आहे. ई-दुचाकी वाहन भाडे व्यवस्थेच्या माध्यमातून वेगाने विस्तारत असलेल्या वितरण क्षेत्राला चालना देणे, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. यासोबतच गुंतवणूकदारांना स्थिर आणि आकर्षक परतावा मिळावा, यासाठी कंपनी फ्रँचायझी मालकी आणि कंपनी संचालन या पद्धतीवर कार्यरत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande