रॅडिसन हॉटेल ग्रुप आणि एमबीडी ग्रुपची धोरणात्मक भागीदारी
पणजी, 24 फेब्रुवारी (हिं.स.) : रॅडिसन हॉटेल ग्रुप (आरएचजी) आणि एमबीडी ग्रुप यांनी मास्टर फ्रँचायझी करारांतर्गत दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे. भारतातील परस्पर संमतीने निश्चित करण्यात येणाऱ्या प्रमुख ठिकाणी आरएचजीचे लक्झरी आणि लाइफस
रॅडिसन हॉटेल ग्रुप आणि एमबीडी ग्रुपची धोरणात्मक भागीदारी


पणजी, 24 फेब्रुवारी (हिं.स.) : रॅडिसन हॉटेल ग्रुप (आरएचजी) आणि एमबीडी ग्रुप यांनी मास्टर फ्रँचायझी करारांतर्गत दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे. भारतातील परस्पर संमतीने निश्चित करण्यात येणाऱ्या प्रमुख ठिकाणी आरएचजीचे लक्झरी आणि लाइफस्टाइल ब्रँड्स रॅडिसन कलेक्शन आणि रॅडिसन रेड यांच्या विस्ताराला गती देणे हा या भागीदारीचा मुख्य उद्देश आहे. आरएचजीच्या जागतिक ब्रँड मानके आणि प्रशासन चौकटीवर आधारित ही भागीदारी देशातील प्रीमियम हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात आहे.

या करारानुसार एमबीडी ग्रुप भारतभर रॅडिसन कलेक्शन आणि रॅडिसन रेड हॉटेल्सच्या व्यवसाय विकास, व्यवस्थापन आणि फ्रँचायझी कार्यात सक्रिय भूमिका बजावेल. RHG चे स्वतंत्र विकास उपक्रम आणि मजबूत भागीदार नेटवर्क यांना पूरक ठरत, ही भागीदारी भारतातील कंपनीच्या वाढीच्या धोरणाला अधिक बळकटी देणार आहे.या सहकार्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे रॅडिसन ब्ल्यू एमबीडी हॉटेल नोएडाचे सर्वंकष उन्नतीकरण करून त्याचे रॅडिसन कलेक्शन एमबीडीमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. हे हॉटेल आरजीएचच्या भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मालमत्तांपैकी एक असून, या पुनर्स्थापनेमुळे देशातील लक्झरी पोर्टफोलिओ अधिक मजबूत होईल.

आरएचजीचे दक्षिण आशियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल शर्मा यांनी सांगितले की, भारतातील प्रीमियम हॉस्पिटॅलिटी बाजारपेठ सातत्याने वाढ दर्शवत आहे आणि डिझाइन-केंद्रित लाइफस्टाइल अनुभवांची मागणी वेगाने वाढत आहे. एमबीडी ग्रुपसोबतची ही भागीदारी प्रमुख बाजारपेठांमध्ये विस्तार साधण्यास निर्णायक ठरेल. एमबीडी ग्रुपच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालिका सोनिका मल्होत्रा कंधारी यांनी पहिल्या दशकात सुमारे 50 सह-ब्रँडेड हॉटेल्स सुरू करण्याचे लक्ष्य जाहीर केले. प्रस्तावित पोर्टफोलिओमध्ये सुमारे 80 टक्के व्यवस्थापित व फ्रँचायझी हॉटेल्स आणि 20 टक्के मालकी हक्काच्या मालमत्ता असतील. अॅसेट-लाइट मॉडेलवर भर देत, विस्तारक्षम आणि दीर्घकालीन मूल्यनिर्मितीवर दोन्ही गटांचा भर राहणार आहे.

एमबीडी ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालिका मोनिका मल्होत्रा कंधारी यांच्या मते, रॅडिसन कलेक्शन एमबीडी कालातीत आणि निवडक लक्झरी अनुभव देईल, तर रॅडिसन रेड एमबीडी धाडसी, सामाजिकदृष्ट्या प्रेरित डिझाइन सादर करेल.या विस्तारित सहकार्याद्वारे भारतातील लक्झरी आणि लाइफस्टाइल हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला नवे परिमाण मिळणार असून, देशाच्या वाढत्या पर्यटन आणि व्यावसायिक गरजांना समर्थ प्रतिसाद देण्याची दोन्ही समूहांची तयारी दिसून येते.

--------------------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande