रेवा डायमंड ज्वेलरीचा 380 कोटींचा आयपीओ बाजारात
नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। ज्वेलरी उत्पादन क्षेत्रात कार्यरत असलेल्या पीएनजीएस रेवा डायमंड ज्वेलरी लिमिटेड या कंपनीचा 380 कोटी रुपयांचा आयपीओ आजपासून गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. गुंतवणूकदारांना 26 फेब्रुवारीपर्यंत या इश्यूमध्ये बोली लावता
Reva Diamond Jewellery IPO


नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। ज्वेलरी उत्पादन क्षेत्रात कार्यरत असलेल्या पीएनजीएस रेवा डायमंड ज्वेलरी लिमिटेड या कंपनीचा 380 कोटी रुपयांचा आयपीओ आजपासून गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. गुंतवणूकदारांना 26 फेब्रुवारीपर्यंत या इश्यूमध्ये बोली लावता येणार असून 27 फेब्रुवारीला शेअर्सचे वाटप होणार आहे. दोन मार्च रोजी शेअर्स डीमॅट खात्यात जमा होतील, तर चार मार्च रोजी कंपनीचे शेअर्स बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत या आयपीओला केवळ 0.05 टक्के प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

या आयपीओसाठी प्रति शेअर 367 ते 386 रुपये असा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. किमान 32 शेअर्सचा एक लॉट असून किरकोळ गुंतवणूकदारांना किमान 12,352 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. कमाल 16 लॉट म्हणजे 512 शेअर्ससाठी जवळपास 1.97 लाख रुपये गुंतवावे लागतील. या इश्यूअंतर्गत 10 रुपयांच्या दर्शनी मूल्याचे 98.44 लाख नवीन शेअर्स जारी केले जात आहेत.

इश्यूमधील 75 टक्के हिस्सा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे. एंकर गुंतवणूकदारांकडून कंपनीने आयपीओपूर्वी 170.58 कोटी रुपये उभारले. टाटा इंडिया कंझ्युमर फंड, टायगर स्ट्रॅटेजीज फंड आणि सेझवन फ्लॅगशिप ग्रोथ फंड यांसारख्या मोठ्या गुंतवणूकदारांनी सहभाग नोंदवला आहे.

कंपनीच्या आर्थिक कामगिरीत चढ-उतार दिसून येतात. 2022-23 मध्ये 51.75 कोटी रुपयांचा नफा मिळाल्यानंतर 2023-24 मध्ये तो घटून 42.41 कोटींवर आला, मात्र 2024-25 मध्ये पुन्हा वाढून 59.47 कोटी झाला. महसुलातही वाढ झाली असली तरी कर्जाचा बोजा वाढलेला आहे. 2024-25 मध्ये कंपनीवर 90.65 कोटींचे कर्ज होते, जे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत 130.25 कोटींवर पोहोचले आहे. वाढता नफा आणि महसूल यामुळे कंपनीला बाजारातून चांगला प्रतिसाद मिळतो का, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande