पुणे - अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा
पुणे, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। अतिवृष्टीमुळे सप्टेंबर महिन्यात जुन्नर तालुक्यातील द्राक्ष, सोयाबीन, भात या प्रमुख पिकासह इतर भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेती पिकांच्या नुकसानीचे पाच कोटी १४ लाख रुपयांचे अनुदान महसूल विभागाकडे
Rain


पुणे, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। अतिवृष्टीमुळे सप्टेंबर महिन्यात जुन्नर तालुक्यातील द्राक्ष, सोयाबीन, भात या प्रमुख पिकासह इतर भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेती पिकांच्या नुकसानीचे पाच कोटी १४ लाख रुपयांचे अनुदान महसूल विभागाकडे नुकतेच जमा झाले आहे. केवायसी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांनी दिली.

तालुक्यातील एक हजार २४८ हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष बागांचे व दोन हजार २९४ .९५ हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन, भात या प्रमुख पिकासह इतर भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल महसूल व कृषी विभागाच्या वतीने शासनाला पाठवण्यात आला होता. त्यानुसार अनुदान महसूल विभाग कडे नुकतेच जमा झाले आहे.

तालुक्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तृणधान्य,सोयाबीन, भात, भाजीपाला पिके व फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सततचा पाऊस, सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे घड निर्मिती न झाल्याने सर्वाधिक नुकसान द्राक्ष या वार्षिक नगदी पिकांचे झाले होते. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे पंचनामा प्रक्रियेतून द्राक्ष पिकाला वगळण्यात आले होते. त्यामुळे इतर पिकांचे पंचनामे केले. मात्र द्राक्ष पिकाचे पंचनामे करण्यात आले नाही. बागांची पाहणी करून द्राक्ष पिकांचे पंचनामे करावेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande