एप्रिलमध्ये शकीराचे भारतात दमदार पुनरागमन; दिल्ली-मुंबईत होणार भव्य कॉन्सर्ट
नवी दिल्ली , 24 फेब्रुवारी (हिं.स.)। ग्लोबल स्टार शकीरा यंदा एप्रिलमध्ये भारतात पुन्हा एकदा दमदार परफॉर्मन्स देणार आहे. या घोषणेनंतर तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. तिने यापूर्वी 2007 मध्ये भारतात परफॉर्म केले होते. तब्बल 19 वर
एप्रिलमध्ये शकीराचे भारतात दमदार पुनरागमन; दिल्ली-मुंबईत होणार भव्य कॉन्सर्ट


नवी दिल्ली , 24 फेब्रुवारी (हिं.स.)। ग्लोबल स्टार शकीरा यंदा एप्रिलमध्ये भारतात पुन्हा एकदा दमदार परफॉर्मन्स देणार आहे. या घोषणेनंतर तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. तिने यापूर्वी 2007 मध्ये भारतात परफॉर्म केले होते. तब्बल 19 वर्षांनंतर शकीरा पुन्हा एकदा आपल्या गाण्याने भारतीय प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी येत आहेत.

लॅटिन पॉपची ग्लोबल स्टार शकीरा यंदाच्या एप्रिलमध्ये जवळपास 19 वर्षांनंतर भारतात दमदार पुनरागमन करणार आहेत. दिल्ली आणि मुंबई येथे त्यांचे कॉन्सर्ट होणार आहेत. 2007 मध्ये ‘ऑरल फिक्सेशन टूर’ दरम्यान मुंबईत त्यांनी केलेल्या संस्मरणीय शो नंतर हा त्यांचा भारतातील पहिला मोठा कॉन्सर्ट असेल.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील कॉन्सर्ट 15 एप्रिल 2026 रोजी होण्याची शक्यता आहे. आयोजक लवकरच अधिकृत तारीख जाहीर करतील. हा शो दिल्लीतील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे आयोजित केला जाऊ शकतो. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मोठ्या संगीत कार्यक्रमांसाठी हे स्टेडियम ओळखले जाते आणि हजारो प्रेक्षकांची क्षमता येथे आहे. मुंबईत शकीरा 10 एप्रिल 2026 रोजी परफॉर्म करणार आहेत. हा कॉन्सर्ट महालक्ष्मी रेसकोर्स येथे होणार आहे. खुल्या मैदानावरील (ओपन-एअर) म्युझिक शोसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.

तिकीट विक्री ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स — डिस्ट्रिक्ट अॅप,बुक माय शो आणि पेटीएम इनसाइडर — यांच्या माध्यमातून होणार आहे. चाहत्यांना जनरल अॅडमिशन, व्हीआयपी आणि अर्ली-बर्ड पास असे विविध पर्याय उपलब्ध असतील. 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजल्यापासून तिकीट बुकिंग सुरू होईल. तिकिटांचे दर 4 हजार रुपयांपासून सुरू होऊन व्हीआयपी तिकिटांसाठी 25 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतात. ऑफलाइन तिकीट विक्रीची घोषणा झाल्यास, अधिकृत काउंटर किंवा कार्यक्रमस्थळाच्या बॉक्स ऑफिसवर कार्यक्रमापूर्वी तिकीटे उपलब्ध होऊ शकतात.

शकीरा यांचा हा दौरा केवळ एक संगीत कार्यक्रम नसेल, तर एका विशेष सामाजिक उपक्रमासह भारताला जागतिक संगीत नकाशावर अधिक भक्कमपणे स्थान देणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande