सोलापूरची कन्या रीत धरमसीची मुंबईत जलतरण स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाची कामगिरी
सोलापूर, 24 फेब्रुवारी, (हिं.स.)। सोलापूर येथील केएलई स्कूलची १० वर्षांची विद्यार्थिनी रीत अंकित धरमसी हिने २२ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई येथे आयोजित ६२ व्या सनक रॉक टू गेट वे ऑफ इंडिया सी स्विमिंग रेस २०२६ मध्ये उल्लेखनीय सहभाग नोंदवला.१० ते ११ वर
सोलापूरची कन्या रीत धरमसीची मुंबईत जलतरण स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाची कामगिरी


सोलापूर, 24 फेब्रुवारी, (हिं.स.)। सोलापूर येथील केएलई स्कूलची १० वर्षांची विद्यार्थिनी रीत अंकित धरमसी हिने २२ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई येथे आयोजित ६२ व्या सनक रॉक टू गेट वे ऑफ इंडिया सी स्विमिंग रेस २०२६ मध्ये उल्लेखनीय सहभाग नोंदवला.१० ते ११ वर्षे वयोगटातील गटात सनक रॉक लाईट हाऊस ते गेटवे ऑफ इंडिया या २ किमी अंतराच्या अरबी समुद्रातील पोहण्याच्या शर्यतीत तिने तिसरा क्रमांक पटकावला. ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक सागरी जलतरण स्पर्धांपैकी एक मानली जाते.रीत ही सोलापूर येथील आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्रीकांत शेटे यांची विद्यार्थिनी असून तिच्या या यशामुळे सोलापूरच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande