लातूर - स्वच्छतेचे प्रश्न तात्काळ सोडवा; मनपा आयुक्तांना निवेदन
लातूर, 24 फेब्रुवारी, (हिं.स.)। शहरातील प्रभाग क्र. 18 मधील नागरिकांना पाणी, लाईट व स्वच्छतेच्या अडचणीच्या प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रभागातील नागरिकांच्या सोयीसाठी पाणी, लाईट व स्वच्छतेचे प्रश्न तात्काळ मार्गी लावून प्रभागातील नागर
निवेदन


लातूर, 24 फेब्रुवारी, (हिं.स.)। शहरातील प्रभाग क्र. 18 मधील नागरिकांना पाणी, लाईट व स्वच्छतेच्या अडचणीच्या प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रभागातील नागरिकांच्या सोयीसाठी पाणी, लाईट व स्वच्छतेचे प्रश्न तात्काळ मार्गी लावून प्रभागातील नागरिकांना योग्य तो न्याय द्यावा. अशा मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टीच्या नुतन नगरसेविका अॅड. आदिती अजित पाटील कव्हेकर यांनी मनपा आयुक्त मानसी मिना यांना दिलेले आहे.

यामध्ये माताजी नगर येथील सुलगुडले अप्पा यांच्या घराजवळील व शनी हनुमान मंदिराच्या बाजुस असलेल्या बोअरमधील मोटारी जळाल्या असून त्या तात्काळ दुरूस्त करण्यात याव्यात. पोस्टल कॉनली अमृत योजना-2 अंतर्गत नवीन पाईपलाईन करण्यात यावी, प्रभाग क्र. 18 मधील मिनी पाईपलाईन खराब झाल्यामुळे जागोजागी पाणी वाया जात आहे. त्यामुळे त्या ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकण्यात यावी, शहरातील भातांब्रे हॉस्पिटल ते महात्मा बसवेश्वर चौक, महात्मा बसवेश्वर चौक ते कव्हा तलाव, भातांब्रे हॉस्पिटल ते स्क्रॅप मार्केट, खंदाडे नगर ते दूगदिवी चौक आदी ठिकाणी 120 वॅटचे पथदिवे बसविण्यात यावेत व प्रभाग 18 मधील विविध भागामध्ये कचऱ्याचे ढीग जागोजागी साचलेले आहेत. याच बंदोबस्त करण्यासाठी घंटागाडी व स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात यावी, अशा विविध मागण्याचे निवेदन नगरसेविका अॅड. आदिती अजित पाटील कव्हेकर यांनी लातूर महानगरपालिकेच्या आयुक्त मानसी मिना यांना दिले असून याबाबत संबंधीत अधिकाऱ्यांना सुचना देऊन प्रभाग 18 मधील नागरी प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात यावेत, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आलेली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande