सोनाटाचे ‘वॉच आऊट फॉर अस’ कॅम्पेन लॉन्च
जिद्दीच्या जोरावर पुढे जाणाऱ्या तरुणाईला सलाम नागपूर, 24 फेब्रुवारी (हिं.स.) : माणसाने आपल्या जिद्दीच्या बळावर किती मोठी झेप घेतली हे महत्त्वाचे असते. हाच संदेश देत सोनाटाने आपले नवे ब्रँड फिल्म कॅम्पेन ‘वॉच आऊट फॉर अस’ सादर केले आहे. उद्दिष्ट, व
सोनाटाच्या नव्या कॅम्पेनचा लोगो


जिद्दीच्या जोरावर पुढे जाणाऱ्या तरुणाईला सलाम

नागपूर, 24 फेब्रुवारी (हिं.स.) : माणसाने आपल्या जिद्दीच्या बळावर किती मोठी झेप घेतली हे महत्त्वाचे असते. हाच संदेश देत सोनाटाने आपले नवे ब्रँड फिल्म कॅम्पेन ‘वॉच आऊट फॉर अस’ सादर केले आहे. उद्दिष्ट, वेग आणि आत्मविश्वासाने प्रेरित असलेल्या आजच्या पिढीचा गौरव करणारे हे कॅम्पेन तरुणाईच्या जिद्दीला आणि त्यांच्या प्रगतीच्या ध्यासाला सलाम करते.

कोणतेही संकट आले तरी त्यावर मात करून पुढे जाण्याची वृत्ती आजच्या पिढीत ठासून भरलेली आहे. त्यांच्यासाठी ‘स्टाईल’ म्हणजे केवळ फॅशन नसून त्यांच्या प्रगतीची ओळख आहे. किंबहुना, त्यांची स्टाईल हीच त्यांची ओळख बनली आहे. स्वतःचे भविष्य स्वतः घडवण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या आणि कठोर परिश्रम करणाऱ्या तरुणांच्या सन्मानार्थ ही फिल्म तयार करण्यात आली आहे.

‘वॉच आऊट फॉर अस’ हे कॅम्पेन म्हणजे सोनाटासाठी एका नव्या अध्यायाची सुरुवात मानली जात आहे. एक असा ब्रँड म्हणून सोनाटा स्वतःला सादर करत आहे, जो तरुण भारताच्या प्रगतीशी घट्ट जोडलेला आहे. हे कॅम्पेन अशा मानसिकतेचे दर्शन घडवते जी कोणाच्याही परवानगीसाठी किंवा मान्यतेसाठी थांबत नाही. ही पिढी स्वतःच्या अटींवर जगते, जिद्दीने पुढे जाते आणि प्रगतीचे मोजमाप इतरांच्या कौतुकावर नव्हे, तर स्वतः गाठलेल्या टप्प्यांवरून करते.या ऊर्जेने भरलेल्या फिल्ममध्ये कष्ट आणि जिद्दीच्या बळावर स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या तीन तरुणांची कथा रॅपच्या ठेक्यावर मांडण्यात आली आहे. ‘यंग इंडिया’च्या धडधडत्या हृदयाचे प्रतिबिंब या फिल्ममधून प्रभावीपणे उमटते.

टायटन कंपनीच्या ॲनालॉग वॉचेस विभागाच्या मुख्य विपणन अधिकारी रंजनी कृष्णस्वामी म्हणाल्या की, “गेल्या वर्षभरात सोनाटाने नव्या पिढीच्या ग्राहकांच्या मानसिकतेशी जुळवून घेण्यासाठी ब्रँडमध्ये जाणीवपूर्वक बदल केले आहेत. ही पिढी महत्त्वाकांक्षी आणि आत्मविश्वासू असून यशाची व्याख्या स्वतःच्या अटींवर करत आहे. ‘व्हॅल्यू-लेड फॅशन वॉच ब्रँड’ म्हणून आमची धोरणे सुसंगतता, सुलभता आणि आकांक्षा यावर आधारित आहेत. आम्ही असा ब्रँड घडवत आहोत जो प्रगतीशील तरुणांच्या विचारांचे आणि बदलत्या जीवनशैलीचे प्रतिबिंब ठरेल, तसेच त्यांच्या प्रवासात त्यांना सक्षम करेल.”

या कॅम्पेनमधून सोनाटा आजच्या पिढीसाठी यशाची नवी ओळख बनण्याच्या दिशेने ठाम पावले टाकत आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande