नांदेड : सिडको-हडको परिसरातील औद्योगिक प्रदूषण थांबवण्याची मागणी
नांदेड, 24 फेब्रुवारी (हिं.स.) – सिडको हडको परिसरलगत असलेल्या औद्योगिक वसाहतीतून येणारी काळी धूळ त्वरित थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा नागरिकांच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ही मागणी सिडकोतील नगरसेवक व प्रतिनिधी सदस्यांनी प्
अ


नांदेड, 24 फेब्रुवारी (हिं.स.) – सिडको हडको परिसरलगत असलेल्या औद्योगिक वसाहतीतून येणारी काळी धूळ त्वरित थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा नागरिकांच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

ही मागणी सिडकोतील नगरसेवक व प्रतिनिधी सदस्यांनी प्रदूषण विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी शिंदे यांना निवेदनाद्वारे केली. सिडको हडको परिसरातील औद्योगिक वसाहतीतून होणा-या प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांना अनेक रोगांचा धोका निर्माण होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

यापूर्वीही औद्योगिक कारखान्यांविरोधात निवेदन आणि आंदोलने झाली होती, परंतु काही दिवसांपूर्वी प्रदूषण तात्पुरते कमी झाले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा धूळ सिडको-हडको आणि गुंडेगाव परिसरात पसरत आहे. नगरसेवकांच्या म्हणण्यानुसार, या धुळीमुळे कॅन्सर, दमा आणि इतर आजारांचा धोका वाढत आहे.

या मागणीसाठी मनपा प्रभाग क्रमांकाचे भाजपा नगरसेवक वैजनाथ देशमुख, सौ. सुवर्णा सतिश बसवदे, सौ. निरंजना राजू लांडगे, माजी नगरसेवक संजय इंगेवाड व राजु लांडगे, सतिश बस्वदे तसेच सिडको-हडको परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी कारखान्यावर कायद्यानुसार कठोर कार्यवाही करण्यास आणि काळी राख त्वरित बंद करण्यास दबाव टाकला.

नगरसेवकांनी स्पष्ट केले की, धूळ बंद झाली नाही तर सिडको-हडको व गुंडेगाव नागरिकांच्या वतीने तीव्र आणि उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे, तसेच परिसरातील नागरिकांना या धुळीपासून मुक्त करण्याची मागणी पुन्हा करण्यात आली आहे.

-----------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande