अमरावती - भंडारज फाट्यावर एसटी-कार भीषण अपघातात दोघांचा मृत्यू
अमरावती, 24 फेब्रुवारी, (हिं.स) जिल्ह्यातील भंडारज फाटा येथे आज दुपारी एसटी बस आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. प्राथमिक माहितीनुसार, बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस समोरून येणाऱ्या कारवर
भंडारज फाट्यावर एसटी-कार भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, दोघे जखमी


भंडारज फाट्यावर एसटी-कार भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, दोघे जखमी


अमरावती, 24 फेब्रुवारी, (हिं.स) जिल्ह्यातील भंडारज फाटा येथे आज दुपारी एसटी बस आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. प्राथमिक माहितीनुसार, बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस समोरून येणाऱ्या कारवर आदळली. धडक इतकी जोरदार होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला.

अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करत जखमींना बाहेर काढले. जखमींवर अंजनगाव सुर्जी येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू आहेत. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. अपघाताचे नेमके कारण व पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande