छ. संभाजीनगर - एक मार्चपासून 'एनएमएनसी कार्ड'ने तिकीट विक्री
छत्रपती संभाजीनगर, 24 फेब्रुवारी (हिं.स.)एसटी प्रवासादरम्यान महिलांना अर्धे तिकीटवर प्रवासाची सुविधा, अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ज्येष्ठांना मोफत प्रवास यासह विद्यार्थी पास योजनेसह अन्य विविध शासनाच्या योजनेतंर्गत सवलतीच्या दरात प्रवास उपलब्ध करून
छ. संभाजीनगर - एक मार्चपासून 'एनएमएनसी कार्ड'ने तिकीट विक्री


छत्रपती संभाजीनगर, 24 फेब्रुवारी (हिं.स.)एसटी प्रवासादरम्यान महिलांना अर्धे तिकीटवर प्रवासाची सुविधा, अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ज्येष्ठांना मोफत प्रवास यासह विद्यार्थी पास योजनेसह अन्य विविध शासनाच्या योजनेतंर्गत सवलतीच्या दरात प्रवास उपलब्ध करून देण्यात येत आहे. सवलतीच्या दरात एसटी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एक मार्चपासून एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) घ्यावे लागणार आहे. एनसीएमसी कार्ड नसेल तर महिला असो किंवा वृद्ध यांना रोख रक्कम देऊन प्रवास करावा लागणार आहे. जिल्ह्यात मध्यवर्ती बस स्थानक, सिडको बस स्थानकासह, गंगापूर, कन्नड, सिल्लोड या ठिकाणी

एनसीएमसी कार्डद्वारे सवलतीच्या दरात प्रवास होणार आहे. यामुळे एसटी महामंडळाच्या विविध बस स्थानकावर एनसीएमसी कार्ड विक्री तसेच माहिती नोंदविण्यासाठी संबंधित कंपनीचे प्रतिनिधी नेमण्यात आलेले आहेत. याशिवाय विविध भागातही एनसीएमसी कार्ड वितरणाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी एनसीएमसी कार्ड घेऊन प्रवास करावा.

शासनाच्या विविध योजना एसटी महामंडळाच्या मार्फत थेट लोकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. यामध्ये अनेक सवलतीच्या दरात प्रवासाच्या योजना राबविण्यात येत आहे. यंदाच्या वर्षी अशा सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्यांसाठी शासनाने एनसीएमसी कार्ड योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सदर एनसीएमसी कार्ड हा सवलत असलेल्या प्रवाशांसह विनासवलत धारी प्रवाशांसाठी वापरता येणार आहे. मात्र सवलतीअंतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एनसीएमसी कार्ड आवश्यक राहणार आहे. या एनसीएमसी कार्डमध्ये प्रवाशांची एकूण माहिती घेतली जाणार आहे. याशिवाय या कार्डसाठी बायोमेट्रिक प्रक्रियेतून एसटी प्रवाशांना जावे लागणार आहे. 'एनसीएमसी कार्ड' नसलेल्या सवलतीत प्रवास करणाऱ्या व्यक्तीला फुल तिकीट देऊन प्रवास करावा लागणार आहे.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande