मुंबई–पुणे एक्सप्रेस-वे तिहेरी अपघात; चालक गंभीर जखमी
रायगड, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। खालापूर पोलीस ठाणे हद्दीत २३ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे सुमारे ४.१५ वाजता मुंबई–पुणे एक्सप्रेस हायवेवर किमी २५ जवळ तिहेरी अपघाताची घटना घडली. या अपघातात एका चालकास गंभीर दुखापत झाली असून तीन वाहनांचे नुकसान झाले आहे.
मुंबई–पुणे एक्सप्रेस वेवर तिहेरी अपघात; चालक गंभीर जखमी

रायगड, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। खालापूर पोलीस ठाणे हद्दीत २३ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे सुमारे ४.१५ वाजता मुंबई–पुणे एक्सप्रेस हायवेवर किमी २५ जवळ तिहेरी अपघाताची घटना घडली. या अपघातात एका चालकास गंभीर दुखापत झाली असून तीन वाहनांचे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी चालक (रा. सुतारपाडा, ता. तलासरी, जि. पालघर) हा आयशर टेम्पो (क्र. जीजे 15 एएक्स 1031) मुंबईहून पुण्याकडे नेत असताना वाहन बेदरकारपणे चालवून पुढे असलेल्या टेम्पो (क्र. एमएच 04 डीटी 9459) ला पाठीमागून धडक दिली. अपघातानंतर आरोपीने वाहन एक्सप्रेस वेच्या मधील लेन क्रमांक ३ मध्येच उभे ठेवले. वाहनाचे इंडिकेटर व लाईट बंद ठेवून कोणताही धोक्याचा इशारा अथवा बॅरिकेडिंग न करता वाहन रस्त्यात सोडल्याने पाठीमागून येणारा कंटेनर (क्र. केए 04 एफ 0721) त्यावर आदळला.

या तिहेरी अपघातात कंटेनर चालक साजिद (रा. हरियाणा) यांना गंभीर दुखापत झाली असून आयशर चालकास किरकोळ दुखापत झाली आहे. तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी खालापूर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ६३/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब), २८५ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार रमेश उघडा करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके

 rajesh pande