रत्नागिरी : ओणीजवळील अपघातात ट्रकचालक जागीच ठार
रत्नागिरी, 24 फेब्रुवारी, (हिं. स.) : मुंबई-गोवा महामार्गावर ओणी-तिवंदामाळ (ता. राजापूर) येथे आज सकाळी पावणेअकराच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात ट्रकचालक महम्मद रिझवान अब्दुल करीम (वय २८, रा. मंगळूर, दक्षिण कन्नड, कर्नाटक) यांचा जागीच मृत्यू झाला
ट्रक अपघात


रत्नागिरी, 24 फेब्रुवारी, (हिं. स.) : मुंबई-गोवा महामार्गावर ओणी-तिवंदामाळ (ता. राजापूर) येथे आज सकाळी पावणेअकराच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात ट्रकचालक महम्मद रिझवान अब्दुल करीम (वय २८, रा. मंगळूर, दक्षिण कन्नड, कर्नाटक) यांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महम्मद रिझवान अब्दुल करीम भारत बेन्झ कंपनीचा (क्र. केए २० एए ३११९) ट्रक घेऊन गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात होते. ओणी तिवंदामाळ येथे सकाळी त्यांचा ट्रक भरधाव वेगाने आला. यावेळी रस्त्यालगत उभ्या असलेल्या राजस्थानी धाब्यासमोरील ट्कवर (क्र. आरजे २७ जीडी ०५३१) त्यांच्या ट्रकची जोरदार धडक बसली. या धडकेत भरधाव ट्रकचालकाला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. धाब्याजवळ उभ्या असलेल्या ट्रकचा चालक सुदैवाने बचावला.अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी मृत ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande