उमेश पाटील यांनी 'जनता काटयाच्या' आश्वासनाची पूर्तता करावी; निवेदन सादर
सोलापूर, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी मला जागा उपलब्ध करून दिली तर मी शेतकऱ्यांच्या उसाची काटामारी बंद करण्यासाठी ''जनता काटा''
उमेश पाटील यांनी 'जनता काटयाच्या' आश्वासनाची पूर्तता करावी; निवेदन सादर


सोलापूर, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी मला जागा उपलब्ध करून दिली तर मी शेतकऱ्यांच्या उसाची काटामारी बंद करण्यासाठी 'जनता काटा' सुरू करणार असे आश्वासन दिले होते.आम्ही जागा उपलब्ध करून देण्यास तयार आहोत, काट्याचे काम सुरू करावे अन्यथा जनतेची खोटे आश्वासन दिले. म्हणून माफी मागावी अशा मागणीचे निवेदन भाजपाच्या वतीने तहसील प्रशासनाला देण्यात आले.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील हे कुरुल जिल्हा परिषद गटातून निवडणुकीसाठी उभे होते. त्यांच्या विरोधात जकराया साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक व भाजपचे उमेदवार सचिन जाधव अशी लढत झाली. या कुरुल गटाच्या निवडणूक प्रचारादरम्यान उमेश पाटील यांनी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या उसाचा काटा मारतो व शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते हा मुद्दा हायलाईट केला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande