सोलापूर - उताऱ्यावरील पोटहिश्शाची मोजणी आता २०० रुपयांत
सोलापूर, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। सातबारा उताऱ्यावरील एकाच कुटुंबातील व्यक्तींना आता आपापल्या पोटहिश्शाची मोजणी अवघ्या २०० रुपयांत करून मिळणार आहे. अर्जदारास नियमित मोजणीच्या निकषांप्रमाणे ९० दिवसांत त्याच्या क्षेत्राची मोजणी करून हद्दी निश्चित करून
सोलापूर - उताऱ्यावरील पोटहिश्शाची मोजणी आता २०० रुपयांत


सोलापूर, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। सातबारा उताऱ्यावरील एकाच कुटुंबातील व्यक्तींना आता आपापल्या पोटहिश्शाची मोजणी अवघ्या २०० रुपयांत करून मिळणार आहे. अर्जदारास नियमित मोजणीच्या निकषांप्रमाणे ९० दिवसांत त्याच्या क्षेत्राची मोजणी करून हद्दी निश्चित करून दिल्या जाणार आहेत.जमीन-जागांचे दर सध्या लाखांमध्ये आहेत. या पार्श्वभूमीवर रक्तनात्यातदेखील जागा-जमिनीवरून वाद होत आहेत. बांध पोखरणे, अतिक्रमण अशा बाबींवरून टोकाचे वाद होत आहेत. त्यातून सोलापूरच्या भूमिअभिलेख कार्यालयाकडे दररोज सरासरी २०० हून अधिक शेतकरी क्षेत्र मोजणीसाठी अर्ज करत आहेत. अनेकजण मोजणीसाठी पोलिसांची मदत घेत आहेत.या पार्श्वभूमीवर राज्याच्या महसूल विभागाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत सातबारा उताऱ्यावरील एकाच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला त्याचा पोटहिश्शा अवघ्या दोनशे रुपयांत मोजून मिळणार आहे. परंतु, भूमिअभिलेख कार्यालयाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने मोजणीसाठी काही विलंब लागू शकतो. शासनाच्या या निर्णयानुसार ऑनलाइन अर्ज केलेल्यांना नियमित मोजणीच्या निकषांनुसार तीन महिन्यांत त्यांच्या क्षेत्राची मोजणी करून मिळेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, करमाळा, मोहोळ, माळशिरस तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी पोटहिश्शाच्या मोजणीसाठी अर्ज केले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande