सोलापूर : महिलांचे सर्वांगीण आरोग्य हीच खरी कुटुंबाची ताकद – डॉ. वर्षा डोईफोडे
सोलापूर, 24 फेब्रुवारी, (हिं.स.) - जिल्हा रुग्णालय सोलापूर व रोटरी क्लब ऑफ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या आरोग्यासाठी सुरू करण्यात आलेल्या “रोटरी आदिशक्ती पिंक क्लिनिक” या विशेष उपक्रमाचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.हा उपक्रम मान
सोलापूर : महिलांचे सर्वांगीण आरोग्य हीच खरी कुटुंबाची ताकद – डॉ. वर्षा डोईफोडे


सोलापूर, 24 फेब्रुवारी, (हिं.स.) - जिल्हा रुग्णालय सोलापूर व रोटरी क्लब ऑफ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या आरोग्यासाठी सुरू करण्यात आलेल्या “रोटरी आदिशक्ती पिंक क्लिनिक” या विशेष उपक्रमाचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.हा उपक्रम माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांच्या संकल्पनेतून आणि रोटरी क्लबच्या सहकार्याने साकार झाला असून, कार्यक्रम प्रांतपाल नियुक्त जयेश पटेल व डॉ. वर्षा डोईफोडे यांच्या हस्ते संपन्न झाला.यावेळी मंचावर डॉ. अग्रजा वरेरकर, डॉ. जयश्री ढवळे, अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज च्या अधिष्ठाता डॉ. माधवी रायते, सौ. पारूल पटेल, जयेश पटेल, धनश्री केळकर, निलेश फोफलिया, संदीप जव्हेरी आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच डॉ. श्रीकांत कुलकर्णी, डॉ. चंद्रकांत क्षीरसागर, डॉ. रोहन वायचळ यांचीही उपस्थिती लाभली.

कार्यक्रमास गौरीताई टिळक विद्यापीठ नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी, सुरवसे प्रशाला येथील विद्यार्थिनी व आशा मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये झुबिन अमेरीया, डॉ. राजीव प्रधान, शिवाजी उपरे, सुनील माहेश्वरी, निशांत डाग, मितेश पंचमीया, संतोष कणेकर, संजय मडूर, पराग कुलकर्णी, आशिष मेहता, शांता येळंबकर, जयश्री चव्हाण, लता चन्ना, स्वाती मनसावले, जान्हवी मखिजा, आसावरी सराफ, कमल जाजू, प्रांजल डागा, सरिता फोफलिया आदींची उपस्थिती होती.“रोटरी आदिशक्ती पिंक क्लिनिक” अंतर्गत महिलांमध्ये आढळणारे कर्करोग, अॅनिमिया, रजोनिवृत्ती (Menopause), उच्च रक्तदाब, मधुमेह आदी आजारांचे निदान व उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. किशोरावस्थेपासून ते रजोनिवृत्तीपर्यंत महिलांच्या शारीरिक, मानसिक आणि हार्मोनल बदलांचा विचार करून ही संकल्पना राबविण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande