अमरावती - महिला आयुक्तांच्या समोरच नगरसेवक चंदू खेडकरांची तक्रारदाराला शिवीगाळ
अमरावती, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। महानगरपालिकेच्या जनसंवाद व समस्या निवारण कार्यक्रमात आज एक संतापजनक प्रकार उघडकीस आला. रहाटगाव प्रभागातील अतिक्रमणाची तक्रार घेऊन आलेल्या नागरिकाला, नवनियुक्त नगरसेवक चंदू खेडकर यांनी चक्क महिला आयुक्त सौम्या शर्मा
महापालिकेत लोकशाहीची पायमल्ली! महिला आयुक्तांच्या समोरच नगरसेवक चंदू खेडकरांची तक्रारदाराला शिवीगाळ


अमरावती, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। महानगरपालिकेच्या जनसंवाद व समस्या निवारण कार्यक्रमात आज एक संतापजनक प्रकार उघडकीस आला. रहाटगाव प्रभागातील अतिक्रमणाची तक्रार घेऊन आलेल्या नागरिकाला, नवनियुक्त नगरसेवक चंदू खेडकर यांनी चक्क महिला आयुक्त सौम्या शर्मा यांच्या उपस्थितीतच अश्लील शिवीगाळ केली. या प्रकारामुळे महापालिकेत खळबळ उडाली असून लोकप्रतिनिधींच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेत जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी 'जनसंवाद' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रहाटगाव प्रभागातील अतिक्रमणाबाबत तक्रार घेऊन काही नागरिक आले होते. या तक्रारीमुळे संतापलेल्या नगरसेवक चंदू खेडकर यांचा संयम सुटला. त्यांनी तक्रारदाराशी हुज्जत घालत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, यावेळी खुद्द मनपा आयुक्त सौम्या शर्मा उपस्थित होत्या. आयुक्तांसमोरच सुरू असलेला हा राडा पाहून उपस्थित अधिकारी आणि नागरिक अवाक झाले.

पहिल्याच निवडीनंतर सत्तेची मस्ती?चंदू खेडकर हे पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. मात्र, पहिल्याच कार्यकाळात जनतेच्या समस्या ऐकून घेण्याऐवजी, तक्रार करणाऱ्यावरच धावून जाण्याच्या त्यांच्या वृत्तीचा सर्वत्र निषेध होत आहे. महिला अधिकाऱ्याचा सन्मान न राखता आणि पदाची प्रतिष्ठा विसरून केलेल्या या कृत्यामुळे राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande