युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांची भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड
कोल्हापूर, 24 फेब्रुवारी (हिं.स.)। भाजप युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी कोल्हापूरचे युथ आयकॉन कृष्णराज धनंजय महाडिक यांची निवड झाली. भाजपची राज्य पातळीवरील विविध विभागाची कार्यकारीणी आणि पदाधिकारी निवड प्रदेश कार्यालयाकडून प्रसिद्ध कर
कृष्णराज महाडिक भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष


कोल्हापूर, 24 फेब्रुवारी (हिं.स.)।

भाजप युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी कोल्हापूरचे युथ आयकॉन कृष्णराज धनंजय महाडिक यांची निवड झाली. भाजपची राज्य पातळीवरील विविध विभागाची कार्यकारीणी आणि पदाधिकारी निवड प्रदेश कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली यामध्ये भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र, आणि सोशल मिडीयावर युथ आयकॉन म्हणून सुप्रसिद्ध असलेले कृष्णराज महाडिक यांची भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे.

कृष्णराज महाडिक यांनी विधान सभेच्या निवडणूकीत कोल्हापूर उत्तर मतदार संघातून भाजपकडे तिकीट मागणी केली होती. त्यावेळी घराणेशाहीवर टीका होईल म्हणून कृष्णराज महाडिक यांना निवडणूक रिंगणापासून दूर ठेवण्यात आले. तरीही त्यावेळी खा. महाडिक यांना मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृष्णराज महाडिक यांना चांगली संधी आणि योग्य जबाबदारी देण्याचे आश्वासन दिले होते. याच आश्वासनाची पूर्तता झाल्याच्या भावना महाडिक कुटुंबियांनी व्यक्त केल्या आहेत.तर कृष्णराज महाडिक यांना भाजप मधील राज्य पातळीवरील युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यामुळे कोल्हापुरात भाजप आणि महाडिक गटात आनंद व्यक्त करून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव आणि जल्लोष केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande