ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाची पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतावर मात
ब्रिस्बेन, 24 फेब्रुवारी (हिं.स.)पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने विश्वविजेत्या भारताचा सहा विकेट्सने पराभव केला. २१५ धावांचे लक्ष्य त्यांनी बेथ मूनी (७६) आणि एलिसा हिली (५०) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ७० चेंडू शिल्लक असताना पार केले. प्रथ
भारतीय महिला क्रिकेट संघ


ब्रिस्बेन, 24 फेब्रुवारी (हिं.स.)पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने विश्वविजेत्या भारताचा सहा विकेट्सने पराभव केला. २१५ धावांचे लक्ष्य त्यांनी बेथ मूनी (७६) आणि एलिसा हिली (५०) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ७० चेंडू शिल्लक असताना पार केले. प्रथम फलंदाजी करताना भारताने २१४ धावा केल्या, ज्यामध्ये हरमनप्रीत कौर (५३) आणि स्मृती मानधना (५८) यांनी अर्धशतके झळकावली. महिला विश्वचषक २०२५ च्या उपांत्य फेरीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियन महिला संघांमधील हा पहिलाच एकदिवसीय सामना होता. ही अॅलिसा हिलीची शेवटची आंतरराष्ट्रीय मालिका देखील आहे. ऑस्ट्रेलियाने शानदार कामगिरी करत विश्वविजेत्या टीम इंडियाचा पराभव केला.

नाणेफेक जिंकत भारतीय संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय चुकीचा ठरला. चार महिन्यांनंतर परतणारी प्रतीका रावल मेगन शटच्या गोलंदाजीवर शून्यावर बाद झाली. तिच्या पुनरागमनामुळे शेफाली वर्माला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागली आणि तीही अपयशी ठरली. १७ चेंडूत चार धावा काढल्यानंतर तिला डार्सी ब्राउनने बाद केले. जेमिमा रॉड्रिग्जला अॅशले गार्डनरने आठ धावांवर बाद केले. ५२ धावांवर तीन विकेट्स गमाव्यानंतर, मानधना आणि हरमनप्रीने चौथ्या विकेटसाठी ४८ धावा जोडल्या.

मानधनाने ६८ चेंडूंचा सामना करत सात चौकारांसह ५८ धावा काढल्या. तिला ताहलिया मॅकग्राने बाद केले. दीप्ती शर्मा (२) आणि रिचा घोष (२३) फारशी कमाल करु शकल्या नाहीत. सहा विकेट्स गमावत १४० धावांवरून, हरमनप्रीत आणि काशवी गौतम (४३) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ५३ धावांची भागीदारी केली. काशवीने ४४ चेंडूत तीन चौकार आणि तितक्याच षटकारांसह ४३ धावा काढत भारताला २०० धावांचा टप्पा ओलांडला. गार्डनर ३३ धावांत तीन विकेट्स घेत सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. तर मेगन शूटने दोन विकेट्स घेतल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने कर्णधार हीली आणि फोबी लिचफिल्डसह शानदार सुरुवात केली. त्यांनी ५५ धावांची भागीदारी केली. श्री चरणी लिचफिल्डला बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. बेथ मूनीने कर्णधारासह ऑस्ट्रेलियाला पुन्हा विजयाच्या मार्गावर आणले. त्यांनी ६४ धावांची भागीदारी केली. शेवटची आंतरराष्ट्रीय मालिका खेळणारी हीली ७० चेंडूत चार चौकारांसह ५० धावा काढल्यानंतर बाद झाली. यानंतर मूनी आणि अॅनाबेल सदरलँडने जबाबदारी घेतली. आणि त्यांनी ८५ धावांची भागीदारी केली. ज्यामुळे ऑस्ट्रेलिया विजयाच्या जवळ पोहोचला. लक्ष्य ११ धावा कमी असताना मूनीला दीप्तीने बाद केले. पण सदरलँडने षटकार मारून सामना संपवला. ती ४४ चेंडूत ४८ धावांवर नाबाद राहिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande