
सोलापूर, 24 फेब्रुवारी, (हिं.स.)। जिल्ह्यात वादळाला सुरवात झाली. अर्ध्या-पाऊण तासांनी काही ठिकाणी अवकाळीच्या धारा कोसळल्या. त्यामुळे अतिवृष्टी, महापुरातून सावरणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा या वादळाचा व अवकाळीचा फटका पाच तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला. काही ठिकाणी काढणीला आलेली ज्वारी, गहू, हरभरा, मका भुईसपाट झाली. तर आंबा, द्राक्ष, केळी बागांनाही त्याचा फटका बसला.
पंढरपूर शहर व परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या अवकाळी पावसाच्या सरीमुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण तयार झाले होते. सायंकाळच्या सुमारास मेघगर्जनेसह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. तालुक्यातील कोर्टी, वाखरी, टाकळी, गोपाळपूर, शेगाव दुमाला, कासेगाव या भागात काही प्रमाणात हलका व तुरळक पाऊस झाला. अत्यंत कमी पाऊस झाल्याने काढणीला आलेली गहू आणि ज्वारी पिके मात्र अवकाळीतून वाचली आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड