ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ 8 वर्षांनी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर
नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी (हिं.स.)ऑस्ट्रेलियाचा पुरुष क्रिकेट संघ आठ वर्षांनी दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. हा दौरा २०२६ च्या अखेरीस होणार आहे. तीन एकदिवसीय सामने आणि तेवढ्याच कसोटी सामने खेळले जातील. ऑस्ट्रेलियाने शेवटचा २०१८ मध्ये दक्षिण आफ्रि
8 वर्षांनी ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार


नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी (हिं.स.)ऑस्ट्रेलियाचा पुरुष क्रिकेट संघ आठ वर्षांनी दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. हा दौरा २०२६ च्या अखेरीस होणार आहे. तीन एकदिवसीय सामने आणि तेवढ्याच कसोटी सामने खेळले जातील. ऑस्ट्रेलियाने शेवटचा २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. जो सँडपेपर गेट घोटाळ्यामुळे चर्चेत होता. दक्षिण आफ्रिका सध्या जागतिक कसोटी अजिंक्यपद विजेता आहे. आफ्रिकेने जून २०२५ मध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करत विजेतेपद पटकावले होते.

क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने त्यांचे २०२६-२७ चे वेळापत्रक जाहीर केले. त्यात म्हटले आहे की, ते ऑस्ट्रेलियाचे यजमानपद भूषवणार आहेत. पहिले तीन एकदिवसीय सामने डर्बन, जोहान्सबर्ग आणि पॉचेफस्ट्रूम येथे खेळले जातील. ही मालिका २४ ते ३० सप्टेंबर दरम्यान खेळवली जाईल. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये डर्बन, गॅबेर्हा आणि केपटाऊन येथे कसोटी मालिका होईल. ऑस्ट्रेलियन संघ एकदिवसीय आणि कसोटी मालिकेदरम्यान एक सराव सामना देखील खेळेल.

दक्षिण आफ्रिकेला जाण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघ झिम्बाब्वेचा दौरा करणार असल्याचे समजते. ते तेथे एकदिवसीय सामने खेळतील. किती सामने खेळले जातील आणि कुठे खेळले जातील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दक्षिण आफ्रिकेचा संघ या वर्षाच्या अखेरीस बांगलादेश आणि इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर कसोटी मालिकाही खेळेल.

ऑस्ट्रेलियाने शेवटच्या वेळी दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका खेळली होती, तेव्हा बराच वाद झाला होता. चेंडू खराब केल्याबद्दल क्रिकेटपटूंंवर बंदी घालण्यात आली होती. स्टीव्ह स्मिथला कर्णधारपद सोडावे लागले होते, तर वॉर्नरला भविष्यात कर्णधारपदावरून बंदी घालण्यात आली होती. दोघांनाही एक वर्षासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहण्यास भाग पाडण्यात आले होते. कॅमेरॉन बॅनक्रॉफ्टला नऊ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande