
रत्नागिरी, 24 फेब्रुवारी, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्ह्यातील महसूल हद्दीमधील शासनाच्या सर्व खात्यांमधील कार्यालयांकरिता शासनाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्टयांव्यतिरिक्त तीन सार्वजनिक सुट्या रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांनी 2026 या वर्षासाठी होळी सणानिमित्त सोमवार 2 मार्च, अनंत चतुर्दशीनिमित्त शुक्रवार 25 सप्टेंबर आणि धनत्रयोदशीनिमित्त शुक्रवार 6 नोव्हेंबर 2026 अशा तीन स्थानिक सुट्या जाहीर केल्या आहेत.याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी