आरटीई प्रवेशासाठी अडीच हजारांवर अर्ज; नामांकित शाळांकडे पालकांचा ओढा
अमरावती, 25 फेब्रुवारी (हिं.स.)| यंदा आरटीई प्रवेश निकषांत बदल करण्यात आले असून प्रवेशासाठी दहा शाळांचे पर्याय देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील २२६ शाळांतर्गत २५४२ जागांसाठी आतापर्यंत अडीच हजार अर्ज सादर झाले आहेत. त्यामुळे यंदा आरटीई प्रवेशात चांगलीच
आरटीई प्रवेशासाठी अडीच हजारांवर अर्ज २२६ शाळा, २५४२ जागा ः नामांकित शाळांकडे पालकांचा ओढा


अमरावती, 25 फेब्रुवारी (हिं.स.)| यंदा आरटीई प्रवेश निकषांत बदल करण्यात आले असून प्रवेशासाठी दहा शाळांचे पर्याय देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील २२६ शाळांतर्गत २५४२ जागांसाठी आतापर्यंत अडीच हजार अर्ज सादर झाले आहेत. त्यामुळे यंदा आरटीई प्रवेशात चांगलीच चुरस पाहायला मिळणार असून नामांकित शाळांकडे पालकांचा ओढा दिसून येत आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) एक किलोमीटर परिसरातील खासगी शाळांमध्ये प्रवेश घेता येणार आहे. शालेय शिक्षण विभागाने याबाबतचे आदेश १२ फेब्रुवारी रोजी जारी केले आहेत. त्यानुसार ऑनलाइन प्रवेश अर्ज भरत असताना पालकांना पाल्याने प्रवेशासाठी जास्तीत जास्त कोणत्याही दहा शाळांचे पर्याय देता येणार आहेत. तसेच पोर्टलवर नोंदविण्यात आलेल्या पाल्याच्या निवासस्थानापासून एक किलोमीटर आणि त्याच्या आतील शाळा दर्शविण्यात येणार आहे. शिवाय लॉटरीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एकाच शाळेचे वाटप होईल. पालकांनी प्रवेशाच्या वेळी दर्शविलेला निवासाचा पत्ता आणि त्यांच्या आधार ओळपत्रावरील निवासाचा पत्ता एकच आहे, याची खात्री करण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande