
नांदेड, 25 फेब्रुवारी (हिं.स.)।नायगाव तालुक्यातील कै. अमृतराव पाटील व इंदिरा सार्वजनिक वाचनालय, नायगाव तसेच तालुक्यातील सार्वजनिक - वाचनालयांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्हा ग्रंथालय संघाचे २८ वे वार्षिक अधिवेशन - रविवार, दि. १ मार्च २०२६ रोजी जनता हायस्कूल, नायगाव बाजार येथे उत्साहात आयोजित करण्यात आले असल्याची माहिती खासदार रवींद्र वसंतराव - चव्हाण यांनी दिली. खा. चव्हाण यांनी युवकांनी वाचनाची सवय - लावून ज्ञानसमृद्ध समाज निर्मितीत सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
ग्रंथ दिंडीने होणार प्रारंभ अधिवेशनाची सुरुवात सकाळी ८.३० वाजता हनुमान मंदिर येथून भव्य ग्रंथ दिंडीने-होणार आहे. ही दिंडी हनुमान मंदिर स्व. वसंतराव चव्हाण जनसंपर्क कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज चौक हेडगेवार चौक मार्गे जनता हायस्कूल येथे पोहोचणार आहे. भजनी मंडळे, वासुदेव, पारंपरिक वेशभूषेतील सहभागी आणि ग्रंथदिंडी धारक मान्यवर यांच्या उपस्थितीत वाचन संस्कृतीचा संदेश देणारी ही शोभायात्रा पार पडणार आहे.
ग्रंथ दिंडीनंतर उद्घाटन समारंभ होणार असून अध्यक्षस्थानी कमल किशोरजी कदम साहेब तर उद्घाटक म्हणून खा. रवींद्र वसंतराव चव्हाण उपस्थित राहणार आहेत. यावेळी ग्रंथ महर्षी गंगाधर पटणे जीवन गौरव सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.
आजची समाज माध्यमे, वाचन संस्कृती आणि आत्मनिर्वाहिता या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून अध्यक्षस्थानी डॉ. गोविंदराव हंबर्डे राहतील. प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी, राज्य ग्रंथनिरीक्षक प्रतापराव सुरेश आणि रंजीत धर्मापुरीकर मार्गदर्शन करणार आहेत.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis