बीड : रोडरोमिओंवर कारवाईसाठी आ. धस यांचा थेट एसपींना फोन
बीड, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। पाटोदा शहरातील ट्रिपल सीट ''रोड रोमिओं''च्या वाढत्या धिंगाण्याबाबत आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. परीक्षा काळात विद्यार्थिनींना होणारा मानसिक त्रास, कर्णकर्कश सायलेन्सरचा आवाज, भरधाव वेगाने दुचाक
बीड : रोडरोमिओंवर कारवाईसाठी आ. धस यांचा थेट एसपींना फोन


बीड, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। पाटोदा शहरातील ट्रिपल सीट 'रोड रोमिओं'च्या वाढत्या धिंगाण्याबाबत आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. परीक्षा काळात विद्यार्थिनींना होणारा मानसिक त्रास, कर्णकर्कश सायलेन्सरचा आवाज, भरधाव वेगाने दुचाकी चालवणे आणि टवाळकीच्या प्रकारांमुळे निर्माण झालेले भीतीचे वातावरण याची माहिती मिळताच त्यांनी थेट बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकनवनीत कंवत तसेच पाटोदा येथील पोलीस उपनिरीक्षक शैलेश पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला.

सदर प्रकरणात कोणतीही तमा न बाळगता कठोरातील कठोर कारवाई तातडीने करण्यात यावी, ट्रिपल सीट प्रवास, वेगमर्यादा उल्लंघन आणि आवाजाचे सायलेन्सर लावून दहशत निर्माण करणाऱ्यांवर थेट दंडात्मक व जप्तीची कारवाई करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना आमदार धस यांनी दिल्याचे समजते. एकदा थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रशासनाला सज्ज केले आहे. या हस्तक्षेपानंतर पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाल्याचे चित्र असून परीक्षा काळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत रोड रोमिओंवर तातडीची कारवाई होण्याची चिन्हे दिसत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande