नांदडे - विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात चोरी; ९८ तोळे चांदीचे मुकुट व रोकड लंपास
नांदेड, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। नायगाव तालुक्यातील रातोळी गावातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना घडली आहे. पहाटे उघडकीस आलेल्या या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून, पोलिसांनी तातडीने तपासाची
नांदडे - विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात चोरी; ९८ तोळे चांदीचे मुकुट व रोकड लंपास


नांदेड, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। नायगाव तालुक्यातील रातोळी गावातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना घडली आहे. पहाटे उघडकीस आलेल्या या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून, पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत.

मंदिरातील देवाच्या चांदीच्या दागिन्यांमध्ये तब्बल ६५ तोळ्यांचा एक मुकुट, ३३ तोळ्यांचा दुसरा मुकुट, सुमारे ३ ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच कपाटात ठेवलेली अंदाजे ३० हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. एकूण लाखोंचा ऐवज चोरीस गेल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

मंदिर उघडताच चोरीचा प्रकार उघडकीस आला. कपाट फोडलेले आणि देवाच्या मूर्तीवरील दागिने गायब झाल्याचे पाहून पुजारी व ग्रामस्थ स्तब्ध झाले. काही क्षणांतच ही वार्ता गावभर पसरली आणि मंदिर परिसरात नागरिकांची गर्दी उसळली.

घटनेची माहिती मिळताच नायगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. श्वान 'कोको'ला कपाटाची चावी व ड्रॉवरचा वास देण्यात आला. त्यानंतर तिने मंदिर परिसरातून सुगावा घेत पूर्वेकडे सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत माहेगाव-कार्ला रोडपर्यंत धाव घेतली. तेथे ती गोल फिरत सतत भुंकू लागली.

या हालचालीवरून चोरटे त्या ठिकाणी वाहनाच्या सहाय्याने पसार झाले असावेत, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी तसेच संशयितांवर लक्ष ठेवण्याचे काम सुरु आहे.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande