बीड : अभिनेत्री प्रियंका उबाळे यांची आधार मल्टीस्टेटला सदिच्छा भेट
बीड, 25 फेब्रुवारी, (हिं.स.)।मराठी सिने व रंगभूमीवरील ख्यातनाम अभिनेत्री प्रियंका उबाळे यांनी अंबाजोगाई येथील आधार मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. अंबाजोगाई च्या मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांचा संस्थेच्या वतीन
अ


बीड, 25 फेब्रुवारी, (हिं.स.)।मराठी सिने व रंगभूमीवरील ख्यातनाम अभिनेत्री प्रियंका उबाळे यांनी अंबाजोगाई येथील आधार मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. अंबाजोगाई च्या मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांचा संस्थेच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

अंबाजोगाई येथे दि. २ मार्च २०२६ रोजी सादर होणाऱ्या “मी रमाई बोलते” या एकांकिकेच्या प्रयोगासाठी निमंत्रण देण्याच्या निमित्ताने त्या आधार मल्टीस्टेटच्या मुख्य कार्यालयात उपस्थित होत्या. समाजप्रबोधनाचा प्रभावी संदेश देणाऱ्या या एकांकिकेच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आतापर्यंत १६ भव्य व यशस्वी प्रयोग सादर केले असून, त्यांच्या अभिनयाची आणि सामाजिक बांधिलकीची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते. आधार मल्टीस्टेट परिवाराच्या वतीने अभिनेत्री प्रियंकाजी उबाळे व त्यांचे पती यांचा पारंपरिक पद्धतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. सुनील सौंदरमल यांनी त्यांचे स्वागत करून त्यांच्या कलात्मक व सामाजिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

समाजप्रबोधन आणि स्त्रीशक्तीचा प्रभावी आवाज म्हणून प्रियंकाजी उबाळे यांनी आपल्या कलाकृतीतून समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचे कार्य केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande