अकोला: सीसीआयची खरेदी बंद होणार, कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत
अकोला, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। येत्या २७ तारखेपासून Cotton Corporation of India अर्थात CCI कडून कापूस खरेदी बंद करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले असून प्रशासनाने खरेदीच
Photo


अकोला, 25 फेब्रुवारी (हिं.स.)।

येत्या २७ तारखेपासून Cotton Corporation of India अर्थात CCI कडून कापूस खरेदी बंद करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले असून प्रशासनाने खरेदीची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवून द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे. राज्यातील अनेक शेतकऱ्यांचा कापूस अद्यापही विक्रीसाठी शिल्लक आहे. अशातच CCI कडून खरेदी प्रक्रिया २७ तारखेपासून बंद करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत. कापसाला योग्य भाव मिळावा आणि शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी कापूस खरेदीची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.

यासोबतच शेतकरी वर्गाने शासनाकडे आणखी काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. शासनाच्या विविध योजना बंद करून शेतकऱ्यांसाठी हमीभावाचा कायदा लागू करावा, वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेताला कंपाउंड करण्यासाठी ७५ टक्के अनुदानावर योजना सुरू करावी, तसेच पिक विमा कवच त्वरित देण्यात यावे अशी मागणी देखील करण्यात येत आहे.

कापूस खरेदीच्या मुदतीबाबत शासन काय निर्णय घेणार याकडे आता शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande