
अकोला, 25 फेब्रुवारी (हिं.स.)।
अकोला महानगरपालिका आयुक्त डॉ.सुनिल लहाने तसेच मनपा उपायुक्त विजय पारतवार आणि दक्षिण झोन कार्यालयाचे सहा.आयुक्त देविदास निकाळजे यांच्या मार्गदर्शनात आज दि. 25 फेब्रुवारी 2026 रोजी युसूफ अली खदान येथील येण्या-जाण्याच्या रस्त्यामध्ये अतिक्रमीत पक्क्या स्वरूपाचे बांधकाम, शासकीय धान्य गोडाऊन, खदान येथील मुख्य रस्त्यावर असलेले भंगारचे दुकान, तार फेन्सींग, आणि शासकीय धान्य गोडाऊनच्या आवार भिंतीला लागून असलेले टीनशेडच्या अतिक्रमणावर दक्षिण झोन कार्यालय आणि अतिक्रमण विभागाव्दारे निष्कसनाची कारवाई करण्यात आली आहे.
अकोला शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतुकीस अडचण निर्माण करणारे अतिक्रमण संबंधीत अतिक्रमण धारकांनी स्वत: आपले काढून मनपा प्रशासनास सहकार्य करावे अन्यथा मनपा प्रशासनाव्दारा संबंधीत अतिक्रमण काढण्यात येणार आहे कृपया संबंधीतांनी याची नोंद घेऊन मनपा प्रशासनास सहकार्य करावे.
या कारवाईत सहा.अतिक्रमण निर्मुलन अधिकारी चंद्रशेखर इंगळे, कनिष्ठ अभियंता प्रतीक कट्यारमल तसेच दक्षिण झोन कार्यालय येथील कर्मचा-यांचा समावेश होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे