अकोला - अखेर दुर्गम खाडसा रस्त्याचे भाग्य उजळले
अकोला, 25 फेब्रुवारी, (हिं.स.)। सातपुड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या आणि हिवरखेड पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचे व सर्व धार्मिक नागरिकांचे श्रद्धास्थान म्हणून मान्यता असलेल्या ऋषी महाराज संस्थान धबधबा खाडसा येथे जाणारा रस्ता अत्यंत दुर्गम होता. त्यामुळे शेतकऱ
Photo


अकोला, 25 फेब्रुवारी, (हिं.स.)। सातपुड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या आणि हिवरखेड पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचे व सर्व धार्मिक नागरिकांचे श्रद्धास्थान म्हणून मान्यता असलेल्या ऋषी महाराज संस्थान धबधबा खाडसा येथे जाणारा रस्ता अत्यंत दुर्गम होता. त्यामुळे शेतकऱ्यांना, भाविकांना, विद्यार्थ्यांना आदिवासी बांधवांना व सर्व प्रवाशांना या रस्त्यावरून ये जा करताना प्रचंड नरक यातना भोगाव्या लागत होत्या. कालांतराने शासनाने हिवरखेड चिचारी, चंदनपुर (हिवरखेड जुने रेल्वे स्टेशन) बोरव्हा धोंडा आखर या रस्त्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केला होता. सदर रस्त्याचे मंजूर झाले होते. प्रत्यक्षात वनविभागाच्या बफर झोन मध्ये काँक्रीट रस्त्याची परवानगी नसतानाही जवळपास दीड वर्षापूर्वीच मोठ्या लोकप्रतिनिधींनी मोठा गाजावाजा करून काम सुरू होणे शक्य नसतानाही भूमिपूजन करून निवडणुकीत त्याचे श्रेय लाटले. परंतु दीड वर्ष होऊनही प्रत्यक्षात काम सुरू झाले नव्हते.

यासाठी हिवरखेड परिसरातील स्थानिक सक्रिय पत्रकारांनी, जागरूक नागरिकांनी, आणि काही लोकप्रतिनिधींनी, आवाज बुलंद करून हा विषय चव्हाट्यावर आणला. त्याला सामाजिक कार्यकर्ते रजनीश पोटे यांची साथ मिळाली. त्यांनी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून काँक्रिट ऐवजी डांबरीकरणाचा रस्ता व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले. तसेच वन विभागाच्या विविध परवानग्या मिळाव्या यासाठी मंत्रालय ते वन समिती इत्यादीं सोबत पाठपुरावा केला. त्यांना पत्रकारांची आणि सामाजिक कार्यकर्त्यांची साथ सुद्धा मिळाली. त्यामुळे काही महिन्यांपूर्वीच या रस्त्याचे काम युद्ध स्तरावर सुरू झाले. हिवरखेड ते धोंडा आखर या जवळपास 15 किलोमीटरच्या रस्त्याचे मजबुतीकरण , खडीकरण, सपाटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे या रस्त्या व्यतिरिक्त ह्याला असणारे दोन प्रमुख जोडरस्ते जसे की शेतकऱ्यांचे व सर्व धार्मिक नागरिकांचे श्रद्धास्थान म्हणून मान्यता असलेल्या ऋषी महाराज संस्थान धबधबा खाडसा येथे जाणाऱ्या रस्त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते धिरज बजाज यांच्या शेतापासून ते खाडसा आणि पुढे झरी ते चिचारी या मार्गाला जोडणारा हा 2 किमीचा मार्ग त्यामध्ये वाढविण्यात आला. तसेच बोरव्हा या आदिवासी गावाजवळ मुख्य मार्गापासून गावाला जोडणारा छोटासा जोड रस्ता हा सुद्धा वाढविण्यात आला.

आता सध्या स्थितीत सामाजिक कार्यकर्ते धिरज बजाज यांच्या शेतापासून ते खाडसा आणि पुढे झरी ते चिचारी या मार्गाला जोडणारा हा 2 किमीचा मार्गाचे डांबरीकरणाचे कार्य पूर्ण झाले आहे. व उर्वरित डांबरीकरणाचे काम सुद्धा युद्ध स्तरावर पूर्ण करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या रस्त्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे सामाजिक कार्यकर्ते रजनीश पोटे, धिरज बजाज, अर्जुन खिरोडकार, यांच्यासह हिवरखेड आणि परिसरातील सर्व सक्रिय पत्रकार बांधव, संबंधित लोकप्रतिनिधी, प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे अधिकारी वानखडे साहेब, बोचे साहेब, तिरपूडे साहेब, कंत्राटदार आणि त्यांचे अधिकारी कर्मचारी तसेच सर्व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्यांचे कौतुक होत आहे.

हजारो शेतकरी, विद्यार्थी, आदिवासी बांधव आणि भाविकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या या रस्त्याच्या कामाला प्रशासन, वनविभाग व संबंधित अधिकाऱ्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे गती मिळाली, याचा आनंद आहे. जेव्हा नागरिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते एखाद्या प्रश्नावर एकत्र येऊन सातत्याने आवाज उठवतात, तेव्हा प्रशासनही सकारात्मक प्रतिसाद देते आणि विकासाची कामे मार्गी लागतात, हा सर्वांच्या एकजुटीचा परिणाम आहे.

रजनीश पोटे

ऋषी महाराज संस्थान हे भाविकांचे श्रद्धास्थान असून येथील रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण व्हावे हे भाविकांचे आणि शेतकऱ्यांचे स्वप्न होते. ते आता पूर्णत्वास आल्यामुळे आम्हाला समाधान वाटत आहे. त्यासाठी सर्व प्रयत्न कर्त्यांचे आम्ही जाहीर आभार व्यक्त करतो.

धिरज संतोष बजाज, सामाजिक कार्यकर्ते हिवरखेड.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande