बीड जिल्हा शिक्षक आघाडीच्या जिल्हा सरचिटणीसपदी अनिल पानसंबळ
बीड, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांतजी शिंदे यांच्या आदेशानुसार बीड जिल्हा शिक्षक आघाडीच्या जिल्हा सरचिटणीसपदी अनिल पानसंबळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघर्षयोद्धा जनसंपर्क कार्य
Q


बीड, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांतजी शिंदे यांच्या आदेशानुसार बीड जिल्हा शिक्षक आघाडीच्या जिल्हा सरचिटणीसपदी अनिल पानसंबळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघर्षयोद्धा जनसंपर्क कार्यालय, बीड येथे त्यांच्या नियुक्तीपत्राचे वितरण करून सत्कार केला. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी व संघटन बळकटीसाठी ते नक्कीच प्रभावीपणे कार्य करतील, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी संतोष भोसले, प्रदीप सजगणे, भाऊसाहेब कदम, गिरीश चाळक, आदी मान्यवर उपस्थित होते.

-------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande