अंबाजोगाईच्या दोन बहिणींच्या अपहरणाचा माजलगावात अयशस्वी प्रयत्न
बीड, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। अंबाजोगाईच्या दोन बहिणींच्या अपहरणाचा माजलगावात अयशस्वी प्रयत्न केला आहे.तिन्ही आरोपीही अंबाजोगाईचे असल्याची माहिती हाती आली आहे माजलगावमध्ये दोन सख्या बहिणींचे अपहरण करण्याचा प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसला आहे.
अंबाजोगाईच्या दोन बहिणींच्या अपहरणाचा माजलगावात अयशस्वी प्रयत्न


बीड, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। अंबाजोगाईच्या दोन बहिणींच्या अपहरणाचा माजलगावात अयशस्वी प्रयत्न केला आहे.तिन्ही आरोपीही अंबाजोगाईचे असल्याची माहिती हाती आली आहे

माजलगावमध्ये दोन सख्या बहिणींचे अपहरण करण्याचा प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसला आहे. पीडित तरुणी अंबाजोगाई येथील रहिवासी असून त्या उपचारासाठी माजलगावला गेल्या होत्या. दवाखान्यातून परतताना एका चारचाकी वाहनातून आलेल्या तिघांनी त्यांना बळजबरीने ओढून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, लहान बहिणीने आरडाओरड केल्याने स्थानिक नागरिक मदतीला धावले. माजलगाव पोलिसांनी या प्रकरणी अंबाजोगाई येथील तिघांना अटक केली आहे. या घटनेबद्दल अंबाजोगाईत संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande