दत्ता देसाई, अतुल पेठे यांना 'मसाप'चे पुरस्कार जाहीर
छत्रपती संभाजीनगर, 25 फेब्रुवारी, (हिं.स.)। मराठवाडा साहित्य परिषदेचा चव्हाण विशेष ''यशवंतराव वाङ्मयपुरस्कार'' दत्ता देसाई यांना ''सत्ताबदल : राष्ट्रीय चक्रव्यूहाचा भेद'' ग्रंथासाठी आणि ''लोटू पाटील नाट्य पुरस्कार'' ज्येष्ठ रंगकर्मी अतुल
दत्ता देसाई, अतुल पेठे यांना 'मसाप'चे पुरस्कार जाहीर


छत्रपती संभाजीनगर, 25 फेब्रुवारी, (हिं.स.)। मराठवाडा साहित्य परिषदेचा चव्हाण विशेष 'यशवंतराव वाङ्मयपुरस्कार' दत्ता देसाई यांना 'सत्ताबदल : राष्ट्रीय चक्रव्यूहाचा भेद' ग्रंथासाठी आणि 'लोटू पाटील नाट्य पुरस्कार' ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे यांना जाहीर झाला आहे.रोख २५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्कारांचे स्वरूप आहे.

'मसाप'च्या सभागृहात १२ मार्च रोजी पुरस्कार प्रदान होईल, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी दिली.

मसाप आणि भवरलाल अँड कांताबाई जैन मल्टिपर्पज फाउंडेशन यांच्या वतीने हे पुरस्कार दिले जातात.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande