परभणी - जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या उपोषणास भाजप महानगराध्यक्षांची भेट
परभणी, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या उपोषणास आज भाजप परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांच्या माग
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या उपोषणास भाजप महानगराध्यक्ष शिवाजी भरोसे यांची भेट


परभणी, 25 फेब्रुवारी (हिं.स.)।

विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या उपोषणास आज भाजप परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या सविस्तर जाणून घेत त्यांना पाठिंबा दर्शविला. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या चौथ्या वेतन आयोगानुसार वेतनत्रुटी दूर करून सुधारित वेतनश्रेणी लागू करणे, पदनाम बदल व पदोन्नतीचे साखळी लाभ मंजूर करणे, सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (OPS) लागू करणे, गोदावरी महामंडळात समाविष्ट असताना वर्ग ३ व ४ कर्मचाऱ्यांचे वेतन पूर्वीप्रमाणे कोषागार कार्यालयामार्फत देणे, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अनुकंपा तत्त्वावर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे तसेच जिल्हा परिषदेमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे समावेशन मूळ व जलसंधारण विभागामध्ये करणे या प्रमुख मागण्यांसाठी हे उपोषण सुरू आहे. यावेळी भरोसे यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त व न्याय्य असल्याचे सांगत शासन स्तरावर योग्य तो पाठपुरावा करून प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. संवादातून व चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली. या प्रसंगी जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटनेचे श्री. मुकुंद खिराडे, श्री. ज्ञानेश्वर शेळके, श्री. मिलिंद खिल्लारे, श्री. संतोष पाठक, श्री. रोहिदास शिनगारे यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande