स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे मच्छिंद्र सानप बिनविरोध
नाशिक, 25 फेब्रुवारी, (हिं.स.)। अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांनी माघार घेतल्याने नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे मच्छिंद्र सानप यांची बिनविरोध निवड झाली.स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक बुधवार, द
स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे मच्छिंद्र सानप बिनविरोध


नाशिक, 25 फेब्रुवारी, (हिं.स.)। अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांनी माघार घेतल्याने नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे मच्छिंद्र सानप यांची बिनविरोध निवड झाली.स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक बुधवार, दि. २५ फेब्रुवारी रोजी स्थायी समिती सभागृह, नाशिक महापालिका, राजीव गांधी भवन येथे पार पडली. या निवडणुकीचे पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सकाळी ११ वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात केली.

स्थायी समिती सभापतीपदासाठी भाजपकडून मच्छिंद्र सानप तर अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे असे दोन नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले होते. माघारीसाठी देण्यात आलेल्या मुदतीत उमेदवार मुकेश शहाणे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे मच्छिंद्र सानप यांची स्थायी समिती सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पीठासन अधिकारी आयुष प्रसाद यांनी केली.

नवीन सभापती म्हणून निवड झाल्याबद्दल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मच्छिंद्र सानप यांचे अभिनंदन केले. यावेळी महापौर हिमगौरी आहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे, आमदार देवयानी फरांदे, म्हाडाचे अध्यक्ष रंजन ठाकरे, भाजप गटनेते अॅड. श्याम बडोदे, शिवसेना गटनेते अजय बोरस्ते तसेच स्थायी समिती सदस्यांनी व नगरसचिव मदन हरिश्चंद्र यांनी सभापती मच्छिंद्र सानप यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

नवीन सभापती मच्छिंद्र सानप यांनी सर्व सदस्यांच्या सहकार्याने पारदर्शक व लोकाभिमुख कार्य करण्याचा संकल्प व्यक्त करून सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande