परभणी - अनधिकृत होर्डिंग्जवर बंदी, विनापरवाना बॅनर लावल्यास गुन्हा दाखल होणार
परभणी, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात शासकीय जागेवर तसेच हायमास्ट पोलवर अनधिकृत डिजिटल बॅनर व होर्डिंग्ज लावण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. याबाबत रविंद्रसिंह परदेशी (पोलीस अधीक्षक, परभणी) व नितीन नार्वेक
छत्रपती शिवाजी महाराज चौकात अनधिकृत होर्डिंग्जवर बंदी विनापरवाना बॅनर लावल्यास गुन्हा दाखल होणार


परभणी, 25 फेब्रुवारी (हिं.स.)।

परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात शासकीय जागेवर तसेच हायमास्ट पोलवर अनधिकृत डिजिटल बॅनर व होर्डिंग्ज लावण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. याबाबत रविंद्रसिंह परदेशी (पोलीस अधीक्षक, परभणी) व नितीन नार्वेकर (महानगरपालिका आयुक्त) यांनी संयुक्तपणे निर्देश दिले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोलवर किंवा जमिनीवर विनापरवाना डिजिटल बॅनर अथवा होर्डिंग्ज लावल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा देणारे सूचना फलक चौक परिसरात लावण्यात आले आहेत. शहराची सुशोभीकरण व वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. या वेळी पोलीस कर्मचारी, महानगरपालिकेचे मुख्य स्वच्छता अधिकारी करण गायकवाड, सुरक्षा विभागाचे नासेर खान तसेच स्वच्छता निरीक्षक न्यायरत्न घुगे उपस्थित होते. प्रशासनाच्या या निर्णयामुळे चौक परिसरातील अनधिकृत फलकांवर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande