
बीड, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये बोनस मिळावे ! अशी मागणी माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केली आहे. आमदार सोळंके म्हणाले,धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये बोनस देण्याच्या निर्णयाबाबत चर्चा झाली,यास निश्चितच आमचा पाठिंबा आहे.मात्र मराठवाड्यातील सद्यस्थिती विचारात घेतल्यास, लाखो क्विंटल कापूस आजही शेतकऱ्यांच्या घरात आहे. Cotton Corporation of India (CCI) यांनी खरेदी केंद्रे बंद केलेली आहेत. तसेच सोयाबीन खरेदी केंद्रेही पूर्वीच बंद झाल्याने सोयाबीन पिकाचीही मोठ्या प्रमाणात साठवण शेतकऱ्यांकडेच आहे.
महाराष्ट्रातील धान उत्पादक शेतकऱ्यांना जसा न्याय देण्यात येत आहे, तसाच न्याय कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनाही देण्यात यावा व त्यांनाही हेक्टरी २० हजार रुपये बोनस जाहीर करण्यात येणार का ? याबाबत प्रश्न उपस्थित केला.
--------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis