रत्नागिरीचा लोकशाही दिन 4 मार्च रोजी
रत्नागिरी, 25 फेब्रुवारी, (हिं. स.) : जिल्हास्तरावर मार्चचा लोकशाही दिन सोमवारऐवजी बुधवार, दि. 4 मार्च 2026 रोजी दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात होणार आहे. दर महिन्याला पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जि
रत्नागिरीचा लोकशाही दिन 4 मार्च रोजी


रत्नागिरी, 25 फेब्रुवारी, (हिं. स.) : जिल्हास्तरावर मार्चचा लोकशाही दिन सोमवारऐवजी बुधवार, दि. 4 मार्च 2026 रोजी दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात होणार आहे.

दर महिन्याला पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. जिल्हाधिकारी यांच्या 18 फेब्रुवारी 2026 रोजीच्या आदेशान्वये सोमवार 2 मार्च 2026 रोजी जिल्ह्यासाठी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच 3 मार्च 2026 रोजी धूलिवंदन असल्याने शासकीय सुट्टी आहे. यामुळे यावेळी लोकशाही दिन 4 मार्च 2026 रोजी होणार आहे, असे उपजिल्हाधिकारी विश्वजित गाताडे यांनी कळविले आहे.

लोकशाही दिनाकरिता नागरिकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनातील उत्तराने नागरिकांचे समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज सादर करू शकतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande