व्हॉट्स अॅप ग्रुपतर्फे आधारतीर्थ आश्रमाला देणगी
मुंबई, 25 फेब्रुवारी, (हिं. स.) : आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या मुंबईतील व्हॉट्स अॅप ग्रुपतर्फे त्र्यंबकेश्वरच्या आधारतीर्थ आश्रमाला देणगी देण्यात आली. आम्हाला गर्व हिंदुत्वाचा हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक सदस्य असलेला व्हॉट्स ॲप
व्हॉट्स अॅप ग्रुपतर्फे आधारतीर्थ आश्रमाला देणगी


मुंबई, 25 फेब्रुवारी, (हिं. स.) : आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या मुंबईतील व्हॉट्स अॅप ग्रुपतर्फे त्र्यंबकेश्वरच्या आधारतीर्थ आश्रमाला देणगी देण्यात आली.

आम्हाला गर्व हिंदुत्वाचा हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक सदस्य असलेला व्हॉट्स ॲप ग्रुप आहे. ग्रुपतर्फे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त एकतिसावा सामाजिक उपक्रम त्र्यंबकेश्वर (जिल्हा नाशिक) येथील आधारतीर्थ या आश्रमात राबविण्यात आला. जयंतीच्या वेळी निवडणूक आचारसंहिता असल्याने आचारसंहिता संपल्यानंतर हा उपक्रम राबविण्यात आला.

आधारतीर्थ आश्रमातील मागणीनुसार अनाथ लहान मुलांना बसण्यासाठी ५ गार्डन बेंच, विविध प्रकारचे कडधान्य, लहान मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण साहित्य, भरपूर शालेय वस्तू, लहान मुलांना कपडे, वेगवेगळ्या प्रकारची बिस्किटे, फरसाण तसेच गृहोपयोगी वस्तू देण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी ग्रुपचे संस्थापक, संचालकसंतोष पाटील, संचालक महेंद्र गुरव, अध्यक्ष सुरेश वाडकर, सेक्रेटरी लवेश म्हात्रे, प्रवक्ते लीलाधर भोईर, सौ. संपदा धोंगडे यांच्यासह राज्यभरातून आलेले ग्रुपचे ५० सदस्य उपस्थित होते.

नाशिक येथील शिवसेनेचे उपनेते दत्ता नाना गायकवाड यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जिल्हा महिला संघटक सौ. स्वाती पाटील, उपजिल्हाप्रमुख महेश बडवे, विभागप्रमुख नितीन जाधव, आश्रमाचे व्यवस्थापक गिरीश मुसळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत विविध वस्तूंचे वितरण करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande