रायगड - शासकीय कार्यालयांत ‘हिरकणी कक्ष’ उभारणीसाठी ई-निविदा आमंत्रित
रायगड, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। जिल्ह्यातील शासकीय कार्यालये व इमारतींमध्ये महिलांसाठी स्तनपानासाठी सुरक्षित व बंधिस्त कक्ष (हिरकणी कक्ष) उभारण्याच्या उद्देशाने जिल्हा महिला व बाल विकास विभागाने ई-निविदा प्रक्रिया जाहीर केली आहे. इच्छुक नामांकित उत्
E-tender invited for construction of ‘Hirkani Kakh’ in government offices


रायगड, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। जिल्ह्यातील शासकीय कार्यालये व इमारतींमध्ये महिलांसाठी स्तनपानासाठी सुरक्षित व बंधिस्त कक्ष (हिरकणी कक्ष) उभारण्याच्या उद्देशाने जिल्हा महिला व बाल विकास विभागाने ई-निविदा प्रक्रिया जाहीर केली आहे. इच्छुक नामांकित उत्पादक, निर्माते कंपन्या, पुरवठादार तसेच नोंदणीकृत कंत्राटदारांनी या कामासाठी आपली निविदा सादर करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे यांनी केले आहे.

महिलांना सार्वजनिक ठिकाणी स्तनपानासाठी सुरक्षित, स्वच्छ आणि गोपनीय जागा उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा व तालुकास्तरावरील विविध शासकीय कार्यालयांमध्ये ‘हिरकणी कक्ष’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे कामानिमित्त शासकीय कार्यालयांत येणाऱ्या माता व बालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. महिलांच्या सन्मान आणि आरोग्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण उपक्रम मानला जात आहे.

दरनिश्चिती व दरकरारासाठी ई-निविदा पद्धतीने ऑनलाईन निविदा मागविण्यात येत असून, संबंधित निविदेची सविस्तर माहिती https://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सदर निविदा दि. 14 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11.00 वाजेपासून दि. 27 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत ऑनलाईन डाउनलोड व ऑनलाईन सबमिशन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत. इच्छुकांनी निर्धारित मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह निविदा सादर कराव्यात, असेही आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande