
छत्रपती संभाजीनगर, 25 फेब्रुवारी (हिं.स.)।
सततची नापिकीव कर्जाच्या कात्रीत सापडलेल्या शेतकऱ्याने विषारी किटकनाक प्राशन करुन आपली जीवनयात्रा संपवली. सिल्लोड तालुक्यातील हळदा येथे ही घटना उघडकीस आली.
तायराम गणपतराव गवळे (वय ७०) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
गवळे यांची डकला शिवारात गट क्रमांक ३१ मध्ये शेती आहे. याच ठिकाणी पत्राच्या वखारीत कोणी नसतांना विषारी किटक औषधी प्राशन केले. ही गोष्ट नातु व इतरांच्या लक्षात येताच आरडाओरडा केला. नातेवाईक व इतरांच्या मदतीने तात्काळ त्यांना उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड
येथे उपचारासाठी दाखल केले असता, उपचारा दरम्यान शेतकऱ्याची प्राणज्योत मालवली. मयत शेतकऱ्याने बँक ऑफ बडोदा शाखा उंडणगांव येथुन तसेच बुलडाणा अर्बन बॅकेतुन सोने तारण कर्ज घेतलेले आहे. सततची नापिकता व बँकेकडुन घेतलेले कर्ज या विवंचेतुन शेतकऱ्याने जीवन संपवले. मृत शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे. या प्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis