
बीड, 25 फेब्रुवारी (हिं.स.)।धारूर किल्ल्याच्या जतन-दुरुस्तीसाठी ११ कोटी २ लाख निधी मंजूर झाले आहेत.
धारूर किल्ला (भुईकोट किल्ला, धारूर) याच्या जतन व संवर्धनासाठी शासनाकडे भरीव निधीची मागणी करण्यात आली होती. किल्ल्यावर आयोजित दीपोत्सव सोहळ्यावेळी याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला होता. त्यानुसार ११ कोटी २ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
हा निधी मंजूर करण्याबाबत दिवंगत अजित दादा पवार यांनी शब्द दिला होता. त्यांनी दिलेला शब्द पूर्ण झाल्याचे पाहण्यासाठी दादा आज आपल्यात असते तर अधिक समाधान वाटले असते. असे आमदार प्रकाश सोळंके यांनी सांगितले.११ कोटी २ लाख निधी मंजूर केल्याबद्दल महायुती सरकारचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis