
नांदेड, 25 फेब्रुवारी (हिं.स.)।नांदेड जिल्ह्याच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाला मोठा फटका बसला रब्बीतील गहू व आंबा फळाचे अतोनात नुकसान, झाले ढगाळ वातावरणाने उत्पादनावर परिणाम झाला.
फळधारणेला अवकाळीचा फटका
अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वारे, आकाशात काळे ढग जमा होऊन विजेच्या कडकडाटसह पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळे रब्बी हंगामातील गहु, हरभरा, ज्वारी पीकासह कोवळ्या आंबा फळाचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे रब्बी पीकातून हाती लागण्याची आशा मावळत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. तालुक्यात जानेवारी अखेरीस सुरू झालेले ढगाळ वातावरण व धुके सलग दहा ते बारा दिवस पसरल्याने हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा आदी पिक उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याच्या भितीने शेतकरी चिंतेत सापडले होते.
आंबा फळधारणा घटण्याचा धोका निर्माण झाला होता. यंदाचा खरिप हंगाम सततचा पाऊस, ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे पीकाचा चिखल झाला होता. त्यामुळे संपूर्ण हंगाम हातातून निसटला.
जानेवारी अखेर ते फेब्रुवारी मधील पहिल्या आठवड्या पर्यंत ढगाळ वातावरणामुळे पीकाला सूर्यप्रकाश अपेक्षित मिळत नव्हता.
बुरशीजन्य रोगासाठी पोषक स्थिती निर्माण झाली.धुके झाल्याने दाणे भरणात अडथळा व त्याची गुणवत्ता आणि वजन घटण्याची भिती निर्माण झाली.
हरभरा पिक करपा व मर रोगाच्या विळख्यात येऊन आर्द्रतेने फुल गळ, शेंगा घट व पीक वाढ खुंटण्याची चिंता वाटत होती. पिकाला रोगापासून संरक्षण व्हावे म्हणून औषधी फवारणीवर खर्च करावा लागला.
गावरान व केशर आंब्यांच्या संवेदनशील काळात आकाशात ढगाळ व धूके संकटाने भुरी रोग प्रादुर्भावाची शक्यता होती. मोहर काळवंडणे, सुकणे व फुलगळीमुळे फळधारणेत घटण्याची भीती होती. त्यामुळे वातावरणात सुधारणा प्रतिबंधात्मक उपायासाठी शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. खरिपातील अतिवृष्टीमुळे शेती पीक नुकसानीची कसर थोडीशी काढण्यासाठी रब्बीची विक्रमी लागवड यंदा ३ हजार ६८६ हेक्टर लागवड अधिक केली. एकूण रब्बी हंगामात २१ हजार ९३.१० हेक्टर लागवड झाली. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या भुईमूग, करडई, गव्हाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. वादळी वाऱ्याने गहु आडवा झाला. त्यावर पुन्हा पाणी पडून पीकाची नासाडी झाली. ज्वारी असताना अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरविण्याचा धोका वाढविला असून शेतकरी चिंतातूर झाला आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis