
बीड, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। गेवराई विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनतेने विधानसभा निवडणुकीत भरभरून आशीर्वाद दिले त्यामुळे मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाची सर्वस्वी जबाबदारी 'शिवछत्र परिवाराची' आहे आणि ती आम्ही निश्चितच सक्षमपणे पार पाडू... ! असे आमदार विजयसिंह पंडित यांनी सांगितले.
गेल्या दीड वर्षांत कोट्यवधी रुपयांचा निधी आपल्या भागात आणला आहे. याच विकासाच्या शृंखलेत गेवराई विधानसभा मतदारसंघातील १७ कोटी रुपये किमतीच्या विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.
मौजे कुक्कडगाव, (ता. बीड) येथे सिंधफना पात्रात पूर संरक्षक भिंत बांधणे - २४८.०९ लक्ष रु
मौजे औरंगपूर (ता. बीड) येथे सिंधफना पात्रात पूर संरक्षक भिंत बांधणे - २४८.४३ लक्ष रु.
मौजे ईटकर (ता. गेवराई) येथे सिंधफना पात्रात पूर संरक्षक भिंत बांधणे - २४४.२१ लक्ष रु.
मौजे राजापूर (ता. गेवराई) येथे विविध विकास कामे करणे - १४६.०० लक्ष रु.
श्री क्षेत्र पांचाळेश्वर (ता. गेवराई) येथे तीर्थक्षेत्र विकास कामे - ७९०.३२ लक्ष रु.
ही कामे दर्जेदार करून घेण्यासाठी वैयक्तिक पातळीवर लक्ष घालणार आहे. विकासाचा हा रथ महायुती सरकारच्या काळात कधीही थांबणार नाही असे त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis